...

15 views

नात .....
नातं म्हणजे नक्की काय ? खरतरं नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांची एकसंध गुंफण . नातं मग ते कोणतेही असू दे,ते सहज असावे . नात्यातील सहजता हा नाती टिकवून ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक ठरतो . एखादी चूक झालीच जर आपल्याकडून तर ती चूक समजून घेऊन सावरूनही घेता यायला हवी


उद्या कदाचित आपल्याकडून ही हे असं घडू शकत हे लक्षात ठेवून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला न तर समजून घेणं हि सोपं जातं आणि सावरून घेणं हि…आपण चुकलो l धडपडलो तरी आपल्याला सावरणारं आधार देणारं आपलं हक्काचं माणूस आपल्या सोबत आहे याची फक्त जाणीवच बरंच बळ देऊन जाते

नातं हे दोन्ही बाजूंनी तितक्याच समानतेने सहजतेने सांभाळावं लागतं.दोन्ही बाजूंनी तितकंच प्रेम ,विश्वास त्याग,समर्पण,आपुलकी असणं,साद-प्रतिसाद हे नात्यांच्या दीर्घायुष्याच रहस्य आहे . त्यामुळे लादलेली नाती फार तकलादू ठरतात .मुळात नाती अशी लादता येतात का ?

आपण जन्म घेतल्या क्षणापासूनच बरीच नाती आपल्याला येउन चिकटतात . पण केवळ रक्ताने जोडलं गेलोय आपण म्हणून आपलं नातं झालं असं असतं का?माझ्या मते नाती जुळण्यासाठी 'रक्त 'पेक्षा 'मन 'जुळणं जास्त महत्वाच ठरतं .अशी मन जुळलेली नाती दीर्घायुषी असतात .लादलं जातं ते नातं नसतंच मुळी ,ती असते तडजोड …. काहीतरी मिळवण्यासाठी स्वार्थासाठी,काहीतरी उद्दिष्ट ठेऊन केलेली .नातं हे लादायचं नसतं ते जपायचं असतं . जगायचं असतं . तरच आयुष्याचा प्रवास सुंदर बनतो . आणि आयुष्याचा प्रवास म्हणजेच काय ?…. तर प्रेम आणि विश्वासाने नाती जपणं आणि जपता जपता जगणं …

नाती आणि आयुष्यही.सुईच्या टोकावरचं जगणं जगताना भान एवढंच ठेवायचं, की नात्याची प्रत्येक नाजूक गाठ विश्‍वासानं आणि प्रेमानं आपोआप पक्की होईल. उसवणार नाही; कारण हीच नाती जोडतात स्नेहबंध. जगण्यातली ही स्नेहार्द स्निग्धता टिकवायला हवी.