...

3 views

सर्व्हे नंबर २५ - भाग ६
सर्व्हे नंबर २५ - भाग ६



सिम्बा ला फार्म हाऊस ची मोकळीक आवडली होती. तो फुलपाखरांबरोबर खेळायचा, गार्डन मध्ये धावायचा, गवतावर लोळायचा. सीमंतिनीलाही इथलं वातावरण आवडलं होत. मला स्वप्न पुरतीच समाधान असाल तरीही घडणाऱ्या घटना आणि जुळलेले संदर्भ मन विचलित करीत होते. देवज्याबांनी सांगितलेली घटना आख्यायिका होती कि आणखी काही? किती खरं, किती खोट? खरं असेल तर नक्की काय घडलं असेल तेव्हा? हाणम्यादा कुठे नि कसा गायब झाला? त्या खजिन्याचं पुढे काय झालं असेल? इतिहास शोधायचा झाल्यास कसा शोधता येईल? अनेक प्रश्न जीवाला घोर लावत होते.

शेवटी नुसता विचार करण्यात काही समाधान नव्हते. सर्व विचार बाजूला सारून मी सीमंतिनी आणि सिम्बाबरोबर वेळ घालवू लागलो. फावळ्या वेळात इतिहास शोधायचा प्रयत्न करू लागलो. सुट्टीचे चार दिवस मजेत गेले. हाली सुद्धा कामावर रुजू झाली होती. घडलेले प्रकार तूर्तत तरी थांबले होते. सुट्ट्या संपवून आम्ही घरी परतलो. मी पुन्हा कामावर रुजू झालो. शरीराने कामात असलो तरीही मन मात्र फार्म हाऊस च्या विचारातच होते. पाड्यावर ऐकलेल्या गोष्टी डोक्यातून जात नव्हत्या. शेवटी अनेक संदर्भ शोधण्यासाठी इंटरनेट चा वापर केला. इंटरनेटवरही त्या परिसराचा काही इतिहास सापडला नाही. आणखी काही करता येईल का या विचारात असतानाच एका मित्राचा फोन आला.

"काय रे कृष्णा, आज कसा फोन केलास?" मी विचारले.

"अरे कोणी चांगला वकील असेल तर सांग" कृष्णा म्हणाला.

"का रे बाबा, काय झालाय?" मी पुन्हा प्रश्न केला.

"जमिनीचा मॅटर आहे, जुने रेकॉर्डस् काढलेत, पुरावे भक्कम आहेत" कृष्णा म्हणाला.

""जुने रेकॉर्डस्" शब्द डोक्यात घुमू लागला. मदत मागण्यासाठी फोन करणाऱ्यानेच जणू मला मदत केली होती. प्रयत्न करायला हरकत नव्हती.

एजन्ट गुप्ताला फोन करून जुने फेरफार, सातबारा, गावनकाशे यांची माहिती कुठे मिळेल याची विचारणा केली.

गुप्ताने त्याच्या ऑफिस ला बोलावले. त्याला पटण्याजोगे कारण पुढे केला.

"आपले मित्र आहेत, मुंबईला राहणारे, त्यांना इकडे फार्म हाऊस साठी जागा घ्यायची आहे. आसपासच्या गावातील जागा आणि कागदपत्रे यांची माहिती पाठव" मी सांगितले.

गुप्ताला कमिशन शी मतलब. फिरणे आणि जागा शोधणे त्याच दैनंदिन काम असल्याने दुसऱ्याच दिवसापासून एक एक जागा आणि कागदपत्रे तो मिळवू लागला.

आता जुन्या कागदपत्रांवरून जुनी लोक शोधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांच्याकडून आणखी जुन्या हकीकती ऐकणे असा क्रम ठरला. जमेल तसा वेळ काढून काम चालू केलं. एकट्याने हे काम शक्य नव्हते. देवज्या बांनी सांगितलेली हकीकत मी सीमंतिनीला सांगितली. सीमंतिनी फार हुशार होती. शिवाय एखाद काम हातात घेतलं कि त्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करणारी. तिला यात आवड वाटली तर मला तिची मदतच होणार होती. जरी भुतंखेतं ती मानत नसली तरीही हालीची भीती दूर करून जुना इतिहास समोर आणायला तिलाही आवडणार होतेच. नको नको म्हणता म्हणता ती तयार झाली. आम्ही काही दिवस फार्म हाऊस वरच राहायचे ठरवले. मला कामावर जायला अर्धा पाऊण तास जास्त वेळ लागणार होता पण संध्याकाळचा वेळ मला उपयोगात पडणार होता. ठरल्याप्रमाणे आम्ही आता फार्म हाऊस वर राहू लागलो. सीमंतिनीला गार्डन मध्ये काही बदल करायचे होते. स्विमिन्ग पुल बांधायचा होता. कारंजा लावायचा होता. तिनेच पुढाकार घेऊन काम चालू केले. बजेट प्रमाणे होईल असा अंदाज आल्यावर एका कॉन्ट्रॅक्टर ला काम दिले. दुसऱ्याच दिवशी कॉन्ट्रॅक्टर ने खोदकाम चालू केले. आखणी केलेल्या भागात १० फुट खोलीचा खड्डा तयार केला. संध्याकाळी घरी जाईतोवर मातीचा ढीग बाजूला रचून कॉन्ट्रॅक्टर निघून गेला. काम कास केलाय हे पाहण्याची घाई मला होतीच. घाईघाईतच घरी पोहोचलो. गाडी गेटजवळ येताच सिम्बा शेपूट हलवत लाडातच जवळ आला.

गाडी एका बाजूला पार्क करून मी उतरलो आणि सिम्बा ला जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. सीमंतिनी स्मितहास्य करत आनंदातच जवळ आली. हातातून डब्याची पिशवी घेतली. मी आणि सिम्बा तडक त्या खड्ड्याच्या दिशेने गेलो. पाहणी करता करता आत उतरून पाहिलं. सिम्बा सुद्धा मागोमाग खड्ड्यामध्ये उतरला. मी चौफेर पाहतच होतो. आत पडलेले दगड माती उचलून बाहेर फेकत होतो. आणि सिम्बा पायाने माती उकरत होता. मी त्याला दम भरला तरीही तो काही ऐकायला तयार नव्हता. मी त्याला त्याच्या मर्जीवर सोडून माझं पाहणीचा काम चालूच ठेवलं. काही वेळ गेला असेल आणि हलकेच थोडा वेगळा दगड माती घसरल्याचा आवाज ऐकू आला. मी मागे वळून पाहिले. सिम्बाने वाकरलेला खड्डा आतून खचला होता. सिम्बा घाबरून मागे झाला. मी सावध होत सिम्बा ला बाजूला केले. सीमंतिनीला आवाज देऊन बोलावले. सीमंतिनी धावतच आली. "सीमंतिनी हे बघ काय झालाय इथे"

सीमंतिनी मातीच्या ढिगाऱ्यावर उभी राहून खाली पाहत होती. "सीमंतिनी एक लोखंडी गज किंवा पहार आणशील का?" मी म्हणालो.

सीमंतिनीने एक पहार, फावडा आणि घमेलं आणलं. ती स्वतःही खड्ड्यात उतरली. पहारचे घाव मारून दगड धोंडे काढू लागलो. जसजसे घाव पडत होते, खाली जमीन पोकळ असल्याचा वेगळा विशिष्ट आवाज येत होता. काळोख पडू लागलेला.

"सीमंतिनी उद्या काम बंद ठेवायला सांगू, काही असो नसो आपण थोडं खॊदून खात्री करून पाहू, नक्की कश्यामुळे जागा पोकळ वाटते."

सीमंतिनीने होकारार्थी मान हलवली. मनात वेगवेगळे विचार येत होते. आणि नकळतच ते देवज्याबा ने सांगितलेल्या गोष्टीशी जोडले जात होते. पहारीचे घाव घालून हात दुखु लागले तरीही दगड काही हलत नव्हते, फुटत नव्हते. शेवटी थकलो. काळोखसुद्धा पडला होता. थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. काम थांबवून मी सिम्बा आणि सीमंतिनी घरात गेलो.
© SURYAKANT_R.J.