...

1 views

अबस्ट्रॅक्ट
स्टेशन वर गर्दी होतीच. लोकल ट्रेन चा प्रवास म्हणजे रोजची एक लढाई च. निधी आज नेहमी पेक्षा लवकर पोचली होती. ट्रेन येई पर्यंत पेंडिंग व्हाट्स अँप मेसेजेस ना उत्तरे देत होती.
अर्थातच ट्रेन उशिराने अपेक्षित होती. लवकर आली असती तर आश्चर्य होत..
अखेर ट्रेन आली आणि मोठ्या कष्टाने निधीने डोअर ची जागा मिळवली.
गर्दीत चेंगरल जाण्यापेक्षा तिला हवेला कापत जायला आवडायचे.
नेहमी तिचे लक्ष आयपॉड मध्ये चालू असलेल्या गाण्यांवर किंवा पॉडकास्ट वर असायचे आणि सोबतच बाहेरच्या त्याच नेहमीच्या दृश्यांकडे.
मध्येच लागणारा पूल, बाजूने वाहणारी नदी, रेल्वे रुळालगत असणारी वस्ती, आकाशात उमटणाऱ्या रंगाच्या छटा अशा गोष्टी पाहत तिचा 15 मिन चा ट्रेन प्रवास असायचा.
ट्रेन ज्या रुळावरून धावते ते रूळ तिने या आधीही पाहिले होते पण आज तीच लक्ष रुळावर तर गेलं पण एकमेकांत गुंतलेले रूळ आणि तरी ट्रेन ने धरलेला अचूक रस्ता यावर अधिक गेलं.
किती गुंतागुंतीची रचना होती ही. एखादा शिल्पकार, चित्रकार जितकं अबस्ट्रॅक्ट काही घडवू शकतो, रेखाटू शकतो तस अबस्ट्रॅक्ट या रुळांनी गुंफल होत.
ट्रेन मध्ये प्रवास करताना किती निर्धास्त असतो ना आपण, कारण स्टेअरिंग कोणा third person च्या हातात असत आणि काही ओळख पाळख नसताना आपण निर्धास्त पणे ती व्यक्ती आपल्याला आपल्या डेस्टिनेशनवर पोचवणार आहे या विश्वासावर आपण ही जर्नी एन्जॉय करत असतो.
निधी ला ही गोष्ट positivity देऊन गेली. आपण छोट्या गोष्टींवर खूप overthink करतो. आयुष्याचे रस्ते सुद्धा असेच गुंतलेले असतात ना..
पण त्या गुंत्याचे कुठले टोक पकडून गुंता सोडवायचा हे हेरलं तर सगळा गुंता खूप सहज सुटतो. जस ट्रेन चालकाला कुठल्या रुळावर गाडी ठेवायची हे अचूक माहिती असते तसे..
असे विचार एकामागून एक सुरू असतानाच 'अरे उतरो जलदी' या आवाजाने तिच्या विचारांची साखळी तुटते.. आणि ती आज तिच्या नेहमीच्या destination ला नवीन उमेद घेऊन उतरते.



© hsk