...

3 views

प्रेमाचा भूतकाळ
सख्या,
तुझ्या आयुष्यातल्या कैक जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येत राहतात . कितीही प्रयत्न केला तरी त्या पासून स्वतःला तोडून टाकणं मला जमत नाही . मी काय करायला हवं ज्याने मला स्वतःबद्दल पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण होणार नाहीत . नेहमी गर्दीत वावरणारी मी, सो कॉल्ड कॉन्फिडन्ट , मी आत्ता स्वतःसोबत काय करतेय हा प्रश्न मला पुन्हा पुन्हा सतावत राहतो .
तसं तुझ्या चालण्या बोलण्यातून तुझं माझ्या वरच प्रेम दिसत नाही असं नाहीय पण तुझा भूतकाळ उकरून काढण्याची माझी सवय काही केल्या जात का नसेल ?? हे असं का ? तुला माहितेय तुला भेटणं हे माझ्या आयुष्यातलं प्रलोभन असावं कदाचित.. तो एक क्षण.. जे जे काही महत्वाचं आणि जवळचं म्हणून मी कवटाळलं होत ते तुझ्या साठी मी मागचा पुढचा विचार न करता सोडून दिल .. आता मी विचार करते हे असं सगळं करणं खरचं बरोबर असतं का? मला माहितेय हे सगळे विचार माझ्या डोक्यात नाही यायला हवेत ... पण ते येतात आणि त्यांनी मी रात्री जागवत आहे हेही खरचं....
तू काहीतरी वेगळा होतास ना आधी ... मला कधी कधी असं वाटतं परिस्थिती ने गांजून गेलेल्या आणि जगाचे टक्के टोणपे खाऊन बनलेल्या एका नव्याच व्यक्ती सोबत मी आहे. हा तो खरा माणूस नव्हेच .. मग मी स्वतःला प्रश्न विचारते.. कदाचित तू जास्त करतेस.. माणसाला पळणारी गोष्ट हवी असते.. मानवी स्वभाव आहे ... तू कदाचित समोर आहेस हे चुकीचं आहे ... हातचं राखून न ठेवता तू भरभरुन प्रेम करतेस हे चुकीचं आहे ... पण असं नसेलही.. मला माहिती नाही ... माझ्याकडं प्रश्न आहेत .. आणि मला उत्तरं हवी आहेत ... तुझी!!!!
© NUTAN