Mission AK (One side प्रेमाचं top secret mission) Part-4
मला ती आवडते, ही बातमी हळूहळू माझ्या पुर्ण अॉफिस मध्ये पसरली आणि सगळ्यांनी मला ह्या मिशन साठी साथ द्यायचे ठरवले.त्या नंतर असंच काही दिवस कॅन्टीन मध्ये तीला पहाण्याचा कार्यक्रम चालू राहीला.एक दिवस ती कॅन्टीनला आलीच नाही मला वाटल सुट्टीवर असेल म्हणून मी पण जास्त विचार नाही केला. पण ती दुसऱ्या दिवशीही नाही आली, त्या मुळे मी खुप अस्वस्थ झालो होतो. तीच्या बरोबर असलेले बाकीचे विद्यार्थी पण येत नव्हते. त्यामुळे आम्ही समजून गेलो होतो की ईनटेनशिप झाली आहे आणी आता काय ती परत येत नाही. मीशन AK हे तीच नाव शोधायच्या आधिच संपल होत त्या नंतर असेच ५ ते ६ दिवस गेले मी कॅन्टीन मध्ये जेवण करत होतो आणि तेवढ्यात तीच्या बरोबरच ईनटेनशिप करत असलेला एक मुलगा कॅन्टीनच्या दारातून आत आला आणि त्यांच्या मागुन ती ही आत आली, त्या वेळी तीला पाहिल्यावर मी येवढा खुश झालतो की माझ्या मनात एकच गाणं वाजत होतं. ' बहारो फुल बरसावो मेरा मेहबूब आया...