...

0 views

अतृप्त आत्म्याला मुक्ती
नीता येतो ग,  काळजी घे चल बाय.असे म्हणून गिरीश आपल्या कामाला निघून गेला. आज त्याची रात्र पाळी होती.  नीता, गिरीश आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी सोनाली. असे नव्यानेच  गिरीश ची बदली  झाली म्हणून भाड्याने या सोसायटी त राहायला आले होते. त्या रात्री त्याची नाईट शिफ्ट असल्यामुळे नीता घरात एकटीच होती.  घरातली इतर काम आटपून मुलीच  सगळं आवरून नीताने झोपायची तयारी केली आणि दिवसभराच्या थकव्या मुळे तिला गाड झोप लागली. .

अचानक  मध्यरात्री २ च्या  सुमारास कोणीतरी बोलल्याचा आवाज येत होता. नीता झोपेतून उठली  आणि घड्याळात बघितले तर रात्रीचे दोन वाजले होते. इतक्या रात्री आवाज कुठून येतो आहे हे बघण्यासाठी नीता हॉल मध्ये आली.
तर समोरचे दृश्य बघून हादरुन च गेली. तिच्या घराच्या हॉल वेगळाच दिसत होता. फर्निचर पण वेगळे च दिसत होते. तिच्या च घरात   एक तिच्याच वयाची बाई आणि तिचा नवरा दोघे हॉल मध्ये बसून गप्पा मारत जेवत होते. त्यांच्या च बाजुला त्यांची लहान मुलगी खेळत होती. हे दृश्य बघून नीता चे डोकेच काम करेना . नीता एखादी टिव्ही वरील मालिका बघत आहे असेच ते दृश्य होते . थोड्यावेळाने ती बाई उठली आणि नीता जवळच येऊ लागली नीता घाबरली पण ती तिच्या बाजुनेच कीचन मध्ये निघून गेली. आणि किचन ओटा आवरू लागली . तिचा नवरा बाहेर  मुली सोबत खेळत होता. नीता ला काही च कळेना हे सगळे काय चालले आहे. इतक्या त सोनाली च्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर पडला आणि ती भानावर आली तिने हाॅलमध्ये बघितले तर कुणीच नव्हतं मग तिने किचन मध्ये बघितले तर तिथेही  कोणी नव्हते सगळे तसेच होते. तीच डोकं च चालेना ती बेडरूम मध्ये गेली तर सोनाली रडत होती. नीता ने सोनाली ला उचलून  मांडीवर घेतले आणि झोपवू लागली. नंतर कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी दुधवाल्याने जेव्हा बेल वाजवली तेव्हा नीता ला जाग आली  . नीता उठली तर रात्री घडलेला प्रसंग तीच्या डोळ्यासमोर उभा राहिला, बेल च्या आवाजाने ती भानावर आली आणि तिने जाऊन दरवाजा उघडला दुध घेऊन ती घरात आली. घर तर नेहमी प्रमाणे च भासत होत. पण तीच्या मनात आता भीती बसली होती. इतक्यात गिरीश पण आला कामावरून.," काय ग नीता, सोनू झोपली आहे का अजून. "नीता च त्याच्या  बोलण्याकडे लक्षच नव्हत काल रात्री जे घडले ते गिरीश ला तीला सांगायचे होते. पण तो आताच कामावरून दमूनभागून आला होता योग्य वेळ बघून सांगू असे तीने ठरवले ." नीता अगं, काय झाले मी तुझ्याशी बोलतोय." "काही नाही तुम्ही फ्रेश व्हा मी तुमच्यासाठी चहा आणि नाष्टा करते. "मग मात्र नीता आपल्या दैनंदिन कामाकडे वळली आणि पटापट आपली कामे आवरू लागली. गिरीश आल्यामुळे आता तीला खूप बरे वाटत  होते. दुपारी जेऊन झाल्यावर नीता ने रात्री घडलेली घटना त्याला सांगितली., तर गिरीश हसायला लागला. गिरीश ला असं हसताना बघून नीता ला खूप राग आला. तिचा राग बघून गिरीश ने आपले हसू आवरले आणि तिला म्हणाला की, "तुला स्वप्न पडले असेल. उगीच घाबरतेस तु. "  तो अस म्हणाला आणि झोपायला गेला रात्रपाळी करून आल्यामुळे तो थकला होता., लगेचच तो झोपी गेला.

             नीता पण आपल्या कामाला लागली. काम आवरुन सोनाली ला घेऊन ती बिल्डिंग खाली तीला खेळायला घेऊन गेली जेणेकरून गिरीश ला शांत पणे झोपता येईल आणि सोनाली ला पण खेळायला मिळेल.  बिल्डिंग खाली छोटीशी बाग  होती तिथे ती सोनाली ला खेळायला घेऊन गेली.  तिथे असणाऱ्या झोपाळया वर सोनाली ला बसवून झोके देऊ लागली  समोर च्या बाकड्यावर एक आजी बसल्या होत्या त्या तिच्या कडेच बघत होत्या.नीता त्यांच्या कडे बघून हसली तश्या त्या आजी पण हसल्या मग नीता सुद्धा सोनाली ला घेऊन त्यांच्या जवळ जाऊन बसली आजी मग तीची विचारपूस करू लागल्या." ,नवीन च दिसतेस , नीता म्हणाली "हो नवीन च आहे. ४0२  मध्ये भाड्याने रहायला आले आहे. माझ्या मिस्टरांची बदली झाली इथे म्हणून आलो इथे. "४0२ ऐकताच आजी जरा गप्प झाल्या. , व अचानक  काही तरी आठवल्या सारखे करून तिथून निघून गेल्या. नीता ला पण सोनाली ला भरवायचे होते म्हणून नीता पण निघाली.
          नीता घरी आली तेव्हा गिरीश पण उठला होता.त्याला कामाला जायला अजून थोडा वेळ होता. तो सोनाली बरोबर खेळत बसला. नीता रात्री च्या स्वयंपाकाला लागली. गिरीश जेवायला बसला तेव्हा नीता म्हणाली की "आपण देव्हारा तर आणला नाही, निदान देवाचा एखादा फोटो तरी आणू. " त्यावर गिरीश म्हणाला, सुट्टी च्या दिवशी आणू. " त्याच आटपून तो कामावर निघून गेला. आणि नीता पण आपल सर्व आटपून झोपायला गेली. जसे दोन वाजले तसा काल सारखाच बोलण्याचा आवाज येऊ लागला त्या आवाजाने नीता ची झोपमोड झाली. नीता ऊठली कालचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला. पण आज तिला आवाज थोडा मोठा वाटला ती बाहेर हाॅलमध्ये आली कालचच ते जोडप होत पण आज ते एकमेकांशी भांडत होते.त्यांची मुलगी बाजूलाच घाबरून रडत बसली होती. सोनाली च्या रडण्याचा आवाज आला तशी नीता भानावर आली. बघते तर काय ❓ समोर काही च नाही. हॉल एकदम शांत आणि जसा होता तसा च होता. नीता बेडरूम मध्ये आली आणि बघते तर काय सोनाली च्या बाजूला ती बाई उभी होती आणि एकटक सोनाली लाच बघत होती. पण तिच्या बघण्यात कुठे ही राग नव्हता वात्सल्य पूर्ण नजरेने ती पाहत होती. नीता ने सोनाली ला लगेच उचलून घेतले आणि परत ती बाई ज्या ठिकाणी उभी होती तिथे बघितले तर तीथे कोणीच नव्हतं. नीता तशी च रात्रभर सोनाली ला घेऊन बसून राहिली. पण नंतर तिला कोणीच दिसले नाही.

              सकाळी जेव्हा गिरीश आला तेव्हा च ती बेडवरून खाली आली. आणि दरवाजा उघडून गिरीश ला मिठी मारली.गिरीश ला कळेचना  काय झाले आहे . ती थोडी शांत झाल्यावर गिरीश ने तीला विचारले की काय झाले आहे. तेव्हा तिने रात्री  घडलेला प्रसंग गिरीश ला सांगितला . गिरीश ने तीला बोलला की तु पहिल्यांदा अशी एकटी राहते आहेस म्हणून तुला असे भास होत असतील. तु लक्ष नको देऊस  . असे म्हणून गिरीश ने तीची समजूत घातली. आणि तो फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेला.   दिवसा आणि गिरीश घरात असताना तिला काही च भास होत नसे. फक्त रात्री दोन च्या आसपास तिला हा भास होई.  तिला असे वाटे की गिरीश ला रात्रपाळी येऊच नये पण असे कसे होईल❓ महिन्यात ला एक आठवडा तरी रात्रपाळी असेच.जरी ती बाई तीला काही त्रास देत नसेल तरी हे असे भास आपल्या ला का होत आहे त हे काही तिला कळेना. गिरीश ला घेऊन देव्हारा तर आणला पण  तो लावायला तिला काही माणूस मिळत नव्हता.

        आज जेव्हा ती गॅलरी त उभी होती तेव्हा तिला त्या आजी दिसल्या ती त्यांना भेटायला खाली गेली. "किती दिवस आली का नाही स गं" आजी नीता ला म्हणाल्या.
नीता चा उतरलेला चेहरा बघून आजी म्हणाल्या, "काय झाले ग. " आजी ं ना सांगू की नको असा विचार नीता च्या मनात आला पण आपल्या आईच्या वयाच्या त्या आहेत कदाचित त्या काही उपाय सुचवतील . नीता ने आजी ना तीला होणाऱ्या भासां बद्दल सांगितले. ते ऐकून आजी तीला म्हणाल्या," नीता अगं तुला सांगावे असे वाटत होते पण तुम्ही आज कालची मुलं या गोष्टी वर विश्वास ठेवाल  की  नाही म्हणून मी काही बोलली नाही. "
   
            पाच सहा वर्षापूर्वी एक तुझ्या कुटुंबा  च सारखे कुटुंब ४०२, मध्ये राहायला आले होते. दिपा अजय आणि त्यांची छोटी मुलगी ओवी. खुप सुंदर कुटुंब होते सुरवातीला सगळे छान होते. पण माहीत नाही काय झाले नंतर नंतर त्यांच्या त भांडणे होऊ लागली. एके दिवशी सकाळी जेव्हा अजय रात्रपाळी करून घरी आला तेव्हा दिपा दार उघडत नव्हती म्हणून अजय ने आपल्या कडच्या चावीने  दरवाजा खोलला  आणि  समोरचे दृश्य बघून तो जागेवरच थिजला . समोर त्याची बायको दिपाचा मृतदेह पंख्याला लटकत होता. तो ओवीला  शोधत बेडरूम मध्ये गेला तर तिथे ओवी झोपली होती आणि तीच्या तोंडातून फेस येत होता.  ओवी चे पण जीवन संपले होते. दिपा ने एक सुसाईड नोट लिहिली होती त्या त तीने जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे असे लिहिले होते. ओवी ची आपल्या नंतर फरफट होऊ नये म्हणून तीचे पण जीवन संपवले होते.
      पण नंतर आम्हाला कळले की अजय सतत तिच्या चारीत्र्याविषयीच संशय घेत असे.  त्यामुळे होणारे वाद आणि त्यातून होणाऱ्या मनस्तापाने दिपा कंटाळली होती म्हणून तीने आत्महत्या केली. काही दिवसांनी तिच्या नवर्याने पण आत्महत्या केली. अशा प्रकारे संशयामुळे एक कुटुंब ची अशी वाता हत झाली 
      आजीनी  नीताला  सांगितले कि, या अधीही  तीन चार कुटुंब आले पण वर्षाच्या आधीच ते निघून जात कदाचित त्यांना पण भास होत होते. पण कधी कोणी सांगितले नाही. " नीताने आजीला विचारले,"आजी आता काय करता येईल .".असे विचारले आजी म्हणाली की ,"बघुया. माझ्या ओळखीचे एक महाराज आहेत त्याना सांगते. तु उद्या मला ह्याच वेळी इथेच  भेट ",असे सांगून आजी तिला बाय करून तिथून निघाल्या. दुसऱ्या दिवशी आजी तीला भेटल्या तेव्हा त्या म्हणाल्या की महाराज घरी येणार आहेत .गुरूवारी महाराज येतील संध्याकाळी ७ वाजता. "  नीता ने गिरीश ला विश्वासात घेऊन सर्व सांगितले होते हो नाही करत गिरीश तयार झाला.
         गुरूवारी बरोबर ७वाजता महाराज आले. आल्या आल्या च त्यांना नकारात्मक उर्जेची जाणीव झाली.  महाराजांनी त्या आत्म्यांना आवाहन केले तसे ते आत्मे लगेच  हजर झाले इतरांना कोणीच दिसत नव्हते पण महाराजांना आणि नीताला सर्व दिसत होते. अजय चा आत्मा महाराजांना म्हणाला की, माझी चुक झाली मी दिपा बरोबर  असे वागायला नको होते. दिपा सुद्धा महाराजांना म्हणाली की माझे पण चुकले महाराज मी माझ्या सोबत माझ्या मुलीचा पण जीव घेतला तीची काहीही चुक नव्हती या सगळ्या त. नीता चा संसार बघून मला माझी चूक समजली महाराज. या आधी ही दोन तीन जण आले होते रहायला . आम्ही त्यांना आमचे अस्तित्व जाणून द्यायचा प्रयत्न केला पण ते घाबरून निघून गेले. आम्हाला मुक्ती हवी आहे महाराज. महाराजांनी आपल्या सामर्थ्याने त्यांना मुक्ती मिळवून दिली.  नीता ने महाराजांचे आभार मानले.
         
           आता नीता ला रात्री कसलेच भास होत नाही त. पण संशयामुळे एक हसत्या खेळत्या कुटुंबाची वाताहत झाली. 