शापित किनारा
गौरवला नुकत्याच सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे त्याचा सारखा हट्ट सुरु होता. “आपण कुठेतरी जाउया आपण कुठेतरी जाउया.” पण मीरा आणि वेदांतला सुट्टीच मिळत नव्हती. त्यामुळे गौरवचा हिरमोड होत होता. एकतर ते सगळे गौरवच्या जुन्या मित्रांना सोडून नवीन घरात शिफ्ट झाले होते त्यामुळे गौरवच्या बरोबरीच तिथे अस कुणीच नव्हत. दुसर म्हणजे गौरव अतिशय खोडकर मुलगा होता. सतत काही न काही खोड्या करत रहायचा. पण आता त्या खोड्यांचा ही त्याला कंटाळा आला होता. त्याच्या मनात एकच विचार सुरु होता. तो म्हणजे कुठेतरी बाहेर जाण्याचा सुट्ट्या लागल्या पासुन त्याच घरात मनच लागत नव्हत. गौरव कुलकर्णी एक आठ वर्षाचा मुलगा होता. जितका हुशार तितकाच जिद्दी एखादी गोष्ट मनात आली कि, ती झालीच पाहिजे असा त्याचा हट्टच असायचा पण यावेळी अस नव्हत. कारण मीरा आणि वेदांतला एकाच वेळी मिटींग आल्या होत्या त्यामुळे दोघांचा ही नाइलाज होता. हे सगळ बघुन गौरव मात्र दोघांवर खुप नाराज होता. शेवटी मीराच त्याला जवळ घेउन समजावते.
मीरा :- “बेटा हे बघ, आपल हे घर नवीन आहे की नाही तसच बाबांच काम पण नवीन आहे. म्हणून इतक काम कराव लागत आपल्या बाबांना. पण पक्क आपण नेक्स्ट वीकला नक्की जाउत बिचवर चालेल तुला पाण्यात खेळायला आवडत न” हे ऐकुन गौरवला काय बोलाव आणि काय नाही असच होउन जात त्याचा आनंद गगनात मावत नाही तो इतका खुश होतो की, आपण दोघांवर रुसलो आहोत हे ही तो विसरुन जातो. आणि त्याच आनंदात त्याच्या तोंडून उदगार बाहेर पडतात.
गौरव :- “गोव्याला जायच आहे.”
मीरा :- “हो, पिलु पण तु असा सारखा त्रास दिला नाहीस तर आज आमची मिटींग झाली की आम्ही सरांशी बोलुन घेतो ओके. चल निघु आम्ही.” मीरा आणि वेदांत ऑफीसला...