...

2 views

अनोखी भेट
*माझी लेखणी साहित्य मंच शहापूर, जि. ठाणे*

*प्रेम कथा लेखन*

*शीर्षक:-भेट अनोखी*

दिनांक 22/08/2023



गोकुळाष्टमीचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस कृष्णा वर माझ खूप प्रेम पण मला वाटलंही नव्हतं की हाच दिवस माझ्यासाठी अनोखा दिवस ठरेल.

आमच्या बिल्डिंगमध्ये एक केळकर नावाचं कुटुंब राहत होतं. त्यांच्याकडे कृष्णाष्टमीला जागरण असायचं कृष्णजन्म साजरा केला जायचा यावर्षी पण होतं.

आम्ही नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे जागरणासाठी गेलो. त्या दिवशी तिथे त्यांच्या मुलाचे मित्र पण होते. आम्हाला बघून ते दोघे त्याच्या मित्राला बोलले अरे या दोघी असतील तर आम्ही थांबणार आम्ही आरती झाली की निघून जाऊ. तेव्हा मोहन त्यांना बोलला अरे त्या काही थांबणार नाही थोड्या वेळाने जाणार आरती झाल्यावरप्रसाद खाऊन आम्ही निघत होतो तेव्हा मोहन दादा ची आई बोलली अगं पोरींनो थांबा तुम्ही जागरणाला आज जास्त पावसामुळे माणसं आली नाही आहेत आम्ही घरातलेच काय खेळणार आणि जागरण करणार सगळे मिळून मजा करू असं म्हटल्यामुळे आम्हाला तिथे थांबायला लागलं आणि मोहन दादा चे पण दोन्ही मित्र थांबले.
हळूहळू ओळख वाढली खेळामुळे मस्ती वाढली तेवढ्यात प्रशांत जेवण करायचं म्हणून आम्ही परत एकत्र पंगतीत बसलो.

त्यावेळेस असं लक्षात आलं की त्यातला एक मुलगा त्याचं नाव सुनील होतं तो सारखा माझ्याकडे रोखून पाहत होता. मी तेव्हा काही बोलले नाही. पण जेव्हा आम्ही पत्ते खेळायला बसलो तेव्हा समोर पार्टनर म्हणून बसला. खेळ सुरु झाला. खेळ पण रंगात आला होता तो डाव आम्ही जिंकला आणि त्यानी पटकन माझा हात हातात घेत अभिनंदन सुषमा असं म्हणाला मी एकदम चमकले याला माझं नाव कसं माहिती मी त्याला विचारलं माझं नाव कसं कळलं तुला तर तो म्हणाला तु मला विसरलीस कबड्डी खेळताना भेटलो होतो आणि घरी पण आलो होतो तुझ्या आबांना
भेटायला. आले का लक्षात आता
आबा बोलले होते ना मोठा झाल्यावर ये स्वतःच्या पायावर उभा रहा आणि मग मागणी घाल.
आता मी हैराण झाले होते.
मी ज्या मुलाला शोधत होते इतके दिवस जो आज माझ्या समोर उभा होता आणि मी त्याला ओळखू शकले नाही.कारण शाळेतला सुनील आणि
आत्ताचा हा सुनील यात खूपच फरक होता तो इतका स्मार्ट दिसत होता की त्याच्यावरून नजर हटत नव्हती बदामी डोळे
कपाळावर येणारे काळे केस
आणि मुखावर असलेले मिस्किल हास्य खूपच छान वाटत होते आणि ते रूप मी माझ्या डोळ्यात साठवत होते.

आवडला का तुम्हांला तुमचा प्रिंस तसे असेल तर उद्याच येतोय मागणी घालायला. आणि काहीही न बोलता मी स्वतः त्याच्यात हरवून गेले.
एवढ्यात आबांचा आवाज कानावर आला काय सुषमा कसा वाटतोय मुलगा ठरवायची ना लग्नाची तारीख रागावली होतीस ना माझ्यावर त्या वेळेस नाही म्हणालो म्हणून अगं तेव्हा तुम्ही लहान होता आज तुम्हीं दोघे तुमच्या पायावर उभे आहात आता माझी काही हरकत नाही. अशा रीतीने आमची कहाणी पूर्ण झाली यामध्ये पण विघ्न आली ती आम्ही दोघांनी मिळून नीस्तरली त्याची कथा नंतर कधी तरी पुढच्या भागात 🙏👍


सुषमा सहस्रबुद्धे
ठाणे डोंबिवली
© All Rights Reserved