...

5 views

ऐकावे जनाचे करावे मनाचे(लघुकथा)
सौरभ बारावी पास झाला होता. आता त्याच्या समोर एक मोठ आव्हान होत. ते म्हणजे पुढे काय? बारावी तर झाली आता पुढे काय करायचं? मी काय शिकु हा खुप मोठा प्रश्न सौरभ समोर होता. यात त्याचे मित्र , परिवार सगळेच मदत करत होते प्रत्येक जण त्याला आपापल्या परीने सल्ला देत होते त्यामुळे तो आणखीनच विचारात पडला. मी नेमकं काय करू मग सौरभने स्वतःच विचार करायच ठरवलं आणि लिस्ट बनवायला घेतली आधी आपल्या समोर कोण कोणते ऑप्शन आहेत याची त्याने एक लिस्ट बनवली नंतर नेमके आपल्याकडे कोणकोणते गुण आहेत याची एक लिस्ट बनवली मग त्याने दोन्ही लिस्ट आपल्या समोर ठेऊन करिअरची निवड केली.
© dhanashri