...

6 views

ती आणि मी एक अधुरी कहाणी भाग -१
गोष्ट अशी आहे की मी आणि ती एकदा भेटलो .हळू हळू भेटी गाठी वाढल्या.कधी भांडण ,कधी रुसवे फुगवे हे नेहमी चालायचं. माझी आणि तिची तशी खूप जुनी ओळख पण कधी कधी वाटतं ती एक न सुटलेले कोडच आहे अजून.मला जेवढं आठवत त्यावरून माझी आणि तिची ओळख बालपणीच झाली नेहमी तीच माझ्या घरी माझ तिच्या घरी जाणं येणं असायचं.या नात्यात एक वळण आल.जे प्रत्येक नात्यात येत असते.तिच्या वाढदिवशी मी तिला एक गंमत म्हणून एक मोठा बॉक्स आणि त्यामध्ये फाडून ठेवलेलं कागदाचे बारीक बारीक तुकडे आणि एक लाकडाचा तुकडा आणि खूप आत मध्ये एक छोटीसी चॉकलेट टाकली आणि हा बॉक्स मी माझ्या बहिणीला दिला तो ती घेवून गेली तिकडे.तिकडे तिच्या वाढदिवस च्या दिवशी तिच्या खूप मैत्रीण आल्या.तिने उत्सुकतेने तो बॉक्स उगडला.तिने खूप वेळ पर्यंत शोधत राहिली की काय आहे ह्या बॉक्स मध्ये पण खूप वेळ झाला तरी तिला काही मिळत नव्हते.त्यात मुळात काही नव्हतेच ही तिला उशिरा कळले.खूप वेळ परेशान झाल्यावर तिला एक लाकडी तुकडा आणि एक चॉकलेट मिलाळी.त्यात तिची फजिती झाली मैत्रीण ने खूप गम्मत केली तिची.बहीण घरी आली तिने हा प्रसंग सांगितला.मला हसूच आवरेना.पण मला काय माहीत होत.की ती आता ह्याचा बदला घेणार अस.पुढच्या वेळी माझा वाढदिवशी तिने दिवसभर ठिय्या मांडला.पण मी काय आलोच नाही.शेवटी मी संध्यकाळी आलो. मग सर्वांनी मला गिफ्ट दिले .मी तिने काय दिले हे बघितला.तर त्यात पिठाचा गोळा होता.मला ते बघून थोडा वेळ रडूच आले.कारण माझ्या साठी तिच्या मनात एक स्पेशल स्पेस होती.मला ते खूप वाईट वाटले. त्यानंतर दोन वर्ष आमचं बोलणे वगैरे बंद होत.मला त्या गोष्टीचं आज ही वाईट वाटत की का दोन वर्ष बोलणे झाला नाही अस.त्यानंतर ११,१२ अशी दोन वर्ष आम्ही सुदैवाने एकाच कॉलेज मध्ये होतो.पण फारशा भेटीगाठी नाही व्हायच्या.कारण की मी १२ वित तेव्हा ती ११ वित होती त्यामुळे .कधीच भेटीगाठ झालीच तर तिच्या सोबत तिच्या मैत्रीण असायचं सोबत त्यामुळे मनमोकळे बोलणे व्हायचं नाही.मीच काहीतरी बहाणे शोधत असे.कधी नोट्स,कधी बुक्स,कधी क्लास चा निम्मित असे.पण आमच्या फोन वर गप्पा व्हायचं.मेसेजेस तर रोज असायचं काही ना काही होत.मला ती आवडू लागली होती.मला हे तिला सांगयच होत पण कसा सांगू हे कळेना.
© shri_ dhatrak