...

2 views

ekla chalo re
*एकला चलो रे ऽऽऽऽ ... एकला चलो...*

समाजामध्ये हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो. तो म्हणजे लोकांचा एकमेकांशी नैसर्गिक संवाद जवळजवळ बंद झाला आहे. घरांमध्ये होणारे छोटे समारंभ, जसे की वाढदिवस, विवाह किंवा अन्य सण, आता हॉलमध्ये साजरे होतात. तिथे इतकी माणसं असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी तेच खूप झालं!

जमलेली माणसं आपापल्या गटात बसून, स्क्रीनच्या मागे लपून राहतात. समारंभ कसला आहे, कोणकोण आलाय, काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी वागतात. काही औपचारिक संवाद होतात - “अरे, आहेस कुठे?” “हल्ली काय नवीन आहे?”...