...

24 views

वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा
आज आमच्या मैत्री परिवारातील अध्यक्षा
​सौ.पौर्णिमा ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून खूप खूप अनंत कोटी शूभेच्छा..🎂🎂💐💐🎂🎂
​ यांच्या वाढदिवसानिमित्त काही तरी लिहिण्याची संधी मिळाली... पण प्रश्न पडलाय की काय लिहू यांच्यासाठी... खरं तर लिहिण्यासारखं भरपूर काही आहे...पण तरीही विचार येतोय..असो..मी तर लिहिणारच...आमची गोड पूनम आभासी दुनियेतील नशीबाने मिळालेली हळवी,लाघवी,तितकीच मनमिळाऊ पूनम...तसं बघायला गेलं तर आमच्या मैत्री परिवारातील प्रत्येक व्यक्ती खूप खूप छान आहेत.. वंश सर पूनम,मधू,आशू,नंदू,अनामिका सर्वच अगदी इतक्या कमी अवधीमध्ये इतके जिवाभावाचे झाले कळलेच नाहीत...खरंच मैत्रीचं नातं किती विलक्षण असते ना...कधी,केव्हा,कशी,कुठे, कुणाशी होईल नाही कळत...मैत्री हि कुठल्याही बंधनाच्या पलिकडे असते... त्यात तर आमची पूनम खूप हळवी, छोट्याशा गोष्टीसाठी डोळयांवाटे अश्रूंसोबत व्यक्त होणारी... तितकीच हक्काने बोलणारी,अगदी डोळ्यांत पाणी येईस्तोवर खळखळून मनसोक्त हसणारी...कधीही भेट नं होता दूर असूनही मी तिच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हावभाव मनात तिच्या बोलण्यावरून अनुभवू शकते... खरंतर ही जादूच म्हणावी लागेल किंवा मैत्रीचं अतूट असलेलं बंध...पण खरंच इतका छान परिवार मिळालाय मला मैत्रीचा आणि त्यात प्रत्येक व्यक्ती माझ्या साठी अनमोल...आणि आमची पूनम तर सांगायलाच नको....
​ आज वाढदिवस तिचा....वाढदिवसानिमित्त तिला भेटवस्तू म्हणून खूप खूप अनंत कोटी शूभेच्छा आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक मनोकामना पूर्ण व्हाव्या तिला जे जे हवं ते सगळ
​सगळं मिळो,,,तिच्या लेखणीतून तिच्या लिखाणाला उदंडता येवो...नेहमी हसत रहा पूनम खूप छान हसतेस तू अगदी मनसोक्त हसत रहा...एक लक्षात असू आपली मैत्री कायम असेल दूर असलो तरीही त्यातली मैत्रीची ओढ कधीच कमी होणार नाही उलट आणखी जवळ येऊ दिसूकधी पण हक्काने साद घातलीस तरी आम्ही सर्व तुझ्यासोबतच दिसू....
​ परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा....💐💐💐🎂🎂🎂💐💐💐