अंधार |Part 1|Marathi Story
पावसाची मोठी सर येण्याअगोदर वातावरण कुंद व्हावे, आकाशात काळे ढग जमल्यामुळे अंधारल्यासारखे वाटून सारी सृष्टी जणू निःशब्द अन् स्तब्ध व्हावी तसे अनन्याच्या घरचे वातावरण झाले होते.
अनन्याचे बाबा मुकाटपणे घरात फेऱ्या मारत होते,आई विचारमग्न अवस्थेत कपाळाला हात लावून बसली होती तर आजी देवासमोर जपमाळ ओढत बसली होती.अनन्याला हे दृष्य पाहून भडभडून आले.आपल्यामुळे घरात एव्हढा तणाव आला आहे या अपराधी भावनेने ती बेडरूम मध्ये धावली अन् उशीत तोंड खुपसून हमसून हमसून रडू लागली.
'अगं काय सांगू तनया तुला? तुझ्या त्या मकरंद भावजीने अनन्याशी लग्न करायला चक्क नकार दिला.मी तिला फक्त एक 'चांगली मैत्रीण 'म्हणून बघतो म्हणे.मग तीन वर्ष का फिरत होता तिच्या बरोबर? टाईमपास म्हणून? आमचं तर अगदी डोकंच आऊट झालंय बघ!'आई तावातावाने तनयाशी बोलत होती फोनवर.
मकरंद हा तनयाचा मावसदीर.तनयाच्या लग्नात अनन्याची त्याच्याशी प्रथमच भेट झाली.परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेला मकरंद एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करत होता. अनन्या अन् मकरंद एकमेकांकडे आकर्षित झाले.भेटीगाठी वाढत गेल्या.दोघेही परस्परांना अनुरूप असल्याने दोन्ही घरातून त्यांना अप्रत्यक्ष संमती होती.
अनन्याचे शिक्षण पूर्ण होऊन ती नोकरीत सेटल झाल्यावर तिचे आई-बाबा विवाहाचा प्रस्ताव घेऊन गेल्यावर मकरंदचे असे घूमजाव? सगळे एकदम चक्रावूनच गेले. ऑफिसमध्ये लंच अवर जवळ आला आणि अनन्याचा मोबाईल वाजला.मकरंदचा फोन होता.अनन्या संतापलीच.सरळ कट करून टाकावा...