हळद आणि हडळ - १०
हळद आणि हडळ - १०
संध्याकाळ झाली. दूरचे पाहुणे मंडळी गावात, शेजारी, घरी यायला चालू झाले. नाक्यापासून मांडवापर्यंत रंगीबिरंगी लाईट्स लावल्या होत्या. मांडवामध्ये मोठाले हॅलोजनचे दिवे लावले होते. पूर्ण घर आंगण प्रकाशाने उजळला आणि लगीन सराईच्या गाण्यांनी परिसर दुमदुमू लागला.
दिवसभरातील घटना अमृताच्या आईच्या, आजीच्या डोळ्यासमोरून जात होत्या. भुताबरोबर संपूर्ण एक रात्र नि एक दिवस कसाबसा गेला होताच, आता पुन्हा तीच वेळ. बरं दिवसा लोकांची ये-जा असते, उजेड असतो, आवाज असतो. पणं रात्री?
जसजशी वेळ सरत होती, कामात व्यस्त असूनही आई, आजी नि अवंती अस्वस्थ होत होत्या. आज सर्व जण देवघरात झोपू (अमृतादेखील) अशी त्यांनी योजना आखली. माणसांची ये-जा होत असताना अमृताचे एकाकी वेगळं वागणं, छोट्या छोट्या गोष्टींतून दिसू लागलं होत. पण आनंदाच्या भरात माणूस उत्सुर्फपणे वागू शकतो असाच सर्वांचा समज होता. पाहुणे मंडळींची जेवणे आटोपली. काही मंडळींना सोबतीला घेऊन अमृताच्या बाबांनी दुसऱ्या दिवसासाठी पिण्याचं पाणी ड्रम मध्ये भरलं. जेवणासाठी भांडी एका बाजूला धुवून ठेवली. सकाळी बाजारातून कोणकोणते सामान आणायचे, त्याची यादी एकाकडे सोपवली. दुपारच्या जेवणासाठी आणि संध्याकाळच्या जेवणासाठी...