...

1 views

प्रणाम महाराज साहेब
महाराजसाहेब 🙏🏻🙏🏻
सादर प्रणाम(मानाचा मुजरा)
खूप दिवस झाले तुमच्याशी बोलायचे आहे बरेच काही सांगायचे आहे पण कसं बोलावं शब्दच सूचत नवते पण ते धाडस आज करतेय.
महाराजसाहेब, एका अर्थाने तुम्ही नाही आहात ते बरेच झाले.येथे वाढलाय भष्टाचार,बेरोजगारी,येथे होतायेत रोजच बलात्कार.तुमच्या काळात देवाच्या मूर्त्या सुरक्षित नवत्या आणि आज स्त्रिया,बालिका सुरक्षित नाही आहेत.ज्या मूर्त्या वाचविण्याचा तुम्ही प्रयत्न केला त्या देवाच्या गाभारयात सात, सात दिवस एखाद्या चिमूरडीवर बलात्कार होतो आणि येथील जनता आपल्या देशाचा राष्टध्वज वापरतेय त्या बलात्कारी लोकांच्या बचावासाठी आणि तरुणाचे काय सांगायचे महाराजसाहेब तो वेगवेगळ्या रंगाची झेंडे घेऊन ऊभा आहे चौका चौकात,तो संप,मोर्चा,आंदलने,दंगे,जाळपोळ हे करण्यातच धन्यता मानतोय.
शिक्षणाच्या बाबतीत तर काही सांगायलाच नको महाराजसाहेब तेथे तर साराच सावळा गोंधळ येथे सगळ्यात जास्त बाजारीकरण तर शिक्षणाचे झाले,रोज नवीन जिआर, कशालाच कशाचा मेळ लागत नाही..
अन माहीत आहे का? महाराजसाहेब तुमच्या नावाचही बाजारीकरण केलयं येथल्या जनतेन.हातात भगवा ध्वज घेऊन,ओठांवर जय भवानी,जय शिवरायचा जय घोष सुरु असतांना एखादी जीन्स टि—शर्ट घातलेली मुलगी यांच्या समोरुन गेली तर तिच्या मांड्याकडे पाहतात.
येथले शाषनकर्ते वाचाळवीर आहेत.५६ इंच छाती म्हणनारे एका छोट्याश्या पीडीत चिमुरडीला न्याय मिळून देऊ शकत नाही आहो येथल्या न्यायमूर्तीचीच गूढरित्या हत्या होतेय तर भोळ्या भाबड्या जनतेच काय?आणि संसदेत केल्या जातात अर्थहिन कविता,मारला जातो डोळा उडतात हास्याचे तुषार. अन येथल्या बळीराज्याच्या साध्या गरजाही होत नाहीत पूर्ण घेतो गळफास लावून तो. सुन्न होऊन जात हे पाहून वाचून अन मग आठवतो तुम्ही केलेला हिरकणीचा सन्मान,सुभेदाराच्या सुनेची साडीचोळी देऊण केलेली बोळवणूक,शेतकर्याची केलेली किंमत,परधर्मीयाच्या धर्मग्रंथाचा केलेला आदर अन असच बरच काही.
महाराजसाहेब आता काहीच उरल नाही हो हे सारं!
आता माणूसच संपत चाललाय,सारच संपत चालय.आता तुमचे विचार फक्त पुस्तकातच उरलेय,तुमचे जय घोष फक्त ओठांवरच राहिलेत.सगळ सगळ बदलय महाराजसाहेब...
आज थोडं जास्तच बोलली मी महाराजसाहेब क्षमा असावी🙏🏻🙏🏻
तुमच्या राज्यातली एक हिरकणी..जया