...

1 views

तीची ओळखं
"प्रत्येकाची काही न काही आवड ही असतेच. कुणाला आपली आवड जोपासण्याची संधी मिळते तर कुणी आपल्या जबाबदऱ्यांमध्ये इतके अडकून जातात की कोणे एकेकाळी आपली काही आवड ही होती हेच ते विसरून जातात."
रुद्राणीची कथा ही काहीशी अशीच आहे.
रुद्राणी एक चांगली सुशिक्षित सुस्वभावी सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलगी होती. तिच्या घरी आई वडील बहीण भाऊ असा मोठा परिवार होता रुद्राणी सगळ्यांची लाडकी होती अगदी लहान भावंडांची सुद्धा घरात त्यांना काहीही लागलं तर आई बाबां ऐवजी ते रुद्राणीलाच सांगत असे. रुद्राणी खेळकर स्वभावाची मुलगी होती तिला गाण्याची खूप आवड होती. म्हणून तिच्या वडिलांनी तिला गाण्याचा क्लास लावला होता.
रुद्राणी जितकी दिसायला सुंदर होती तितकीच ती कामातही हुशार होती. रुद्राणी घरातली सगळी काम आटपून ऑफिस करून मग क्लासला जात असे. ती आपल्या जबाबदाऱ्या कधीच झटकत नसे त्यामुळे ऑफिस असो किंवा घर रुद्राणीने आपली एक वेगळीच ओळख बनवली होती. रुद्राणी ज्या ऑफिसमध्ये काम करत होती त्याच ऑफिसमध्ये पारस नावाचा एक सुंदर देखणा मुलगा ही काम करत होता. त्याच रुद्राणीवर खूप प्रेम होतं. पारस देखणा होता आणि नव्या विचारांचा ही होता पण त्याच्या घरचे मात्र जुन्या विचारांचे होते त्यांना मुलींनी बाहेर जाऊन शिकलेलं किंवा एखादी कला जोपासलेली आवडत नसे त्यांनी फक्त घरकामात मदत करावी मग ती मुलगी असो किंवा सून असो.
रुद्राणी आणि पारस दोघांच्या घरच्यांच्या विचारात जितकी तफावत होती तितकेच रुद्राणी आणि पारसचे देखील विचार एकमेकांपेक्षा भिन्न होते रुद्राणी मोठे स्वप्न पाहणारी पण सगळ्यांना आनंदात ठेवणारी मुलगी होती त्याच्या उलट पारसला आहे त्या...