...

54 views

अशीही काही नाती...
नातं म्हणजे काय...? नातं म्हणजे "ऋणानुबंध" मग या नात्याला वय, नावं, रंग, रूप, जात, धर्म, लिंग आणि भाषा यांचा गंध आणि लवलेश ही नसतो, तेच खरे अंत:करणातील पारदर्शी, निर्मळ आणि पवित्र नाते असते...
मग माझ्या ही आयुष्याच्या वाटेवर मी
कधीच विचारही केला नव्हता, की जीवन प्रवासात अशीही काही नाती जोडली जातील... आणि आज मी या सगळ्या माणसांशी म्हणजेच त्यांच्या मनाशी माझे मन, माझ्या हृदयाने एकजीव झाले आहे. आणि नकळतचं मी मनाने मैत्री नात्यात भावनिक जोडले गेले आहे...

ही नाती मी माझ्या भावनांनी, स्वभावानी, विचारांनी आणि विश्वासानी माझ्या हृदयात जोडली आणि जपली आहेत... खरचं आपल्या या अफाट, अगणित विश्वात काही अल्प प्रमाणात लोकसंख्या नाहीये, की बोटावर माणसं मोजावीत आणि नाती जोडावीत...
मग काय ऋणानुबंध असतील, की आयुष्याच्या या टप्प्यावर मोबाईल नावाचं यंत्र उपलब्ध व्हावं, मग त्याचा अती प्रमाणात प्रसार व्हावा, मग नवनवीन app निघावीत आणि लहानपणापासून वाचनाची आवड आणि लिखाणाच्या गोडीने पुन्हा तरूण वयात झेप घेण्यासाठी डोकं वर काढावं आणि जे छंद बालपणीचे होते, ते आज वाचन आणि लिखाणातून उदयास यावे, पूर्ण व्हावे... आणि या प्रवासात सहकार्य आणि साथ मिळावी ती मी जोडलेल्या अशा ही काही नात्यांची..

हो, मग या जीवन प्रवासात अशीही काही अविस्मरणीय नाती योगायोगाने जोडली जावीत... आज अशी अवस्था झाली आहे, की या माणसांशी एक दिवस ही नाही संवाद झाला तरी मन कुठे तरी हरवल्या सारखे वाटते. आणि आतून उदास, बेचैन वाटते...

खरचं रक्ताच्या नात्याला ही लाजवतील अशीही काही मैत्री नावाची नाती या जगात निर्माण होऊ शकतात... आणि ते भाग्य मला मिळाले आणि ती कला मला लाभली...

"I'm so proud of the friendship I've made" 🤝

{POONAM}🖊️