सर्व्हे नंबर २५ - भाग ४
सर्व्हे नंबर २५
भाग ४
"बरं, नाही माहित तर जाऊ दे, जा लाकडं फोड आणि जेवणासाठी सामान सांगतो ते आणून दे" मी हाल्याला सांगितले.
हाल्या तेथून निघून गेला. मी सुद्धा अंघोळीसाठी आत गेलो. फ्रेश होऊन बाहेर आलो तेव्हा हाल्या हालीला काहीतरी सांगत असल्याचं दिसलं. हाली आ वासून, डोळे विस्फारून, तोंडावर हात ठेऊन हाल्याच्या बोलण्याला व्यक्त होत होती. त्यांच्या वैयक्तिक बाबतीत आपण पडू नये म्हणून मी दुर्लक्षित करून झाडांचे निरीक्षण करू लागलो. एका एका झाडाजवळ जाऊन त्यांना पाहू लागलो. वातावरण खूपच विलोभनीय होत.
सकाळचा चहा नाश्ता मग दुपारचं जेवण उरकुन दुपारी थोडी विश्रांती घेतली.
संध्याकाळी पुन्हा परतीची तयारी केली. परत येताना हाल्या आणि हाली गाडीजवळ आले होते. हाली मितभाषी होती. सीमंतिनीला तीच काम, वागणं बोलणं आवडलं होत. हाली सारखी सारखी सीमंतिनी कडे पाहत होती. तिला काहीतरी सांगायचं आहे, पणं ती बोलण्याचं धाडस करत नाही अशी मला शंका येऊ लागली.
मी सीमंतिनीला हळू आवाजातच सांगितलं,"बघ बाहेर जाऊन, विचारून घे". सीमंतिनी गाडीतून उतरून काहीतरी बहाना करत घरात गेली. हालीला आवाज देऊन तिला आत...