...

9 views

भारत, कर्म, धर्म आणि विश्वशांती
भारतीय, अनं त्यातल्यात्यात हिंदू धर्म नव्हे, तर ती जीवनशैली व संस्कृती म्हटलं की प्रत्येक क्षण व सण साजरं करून आयुष्य उत्सफुर्तपणे जगणं...

मग कुणी स्वधर्मिय वा इतर धर्मिय याच हिंदू संस्कृतीला नावं ठेवतात; पण तिच्या उत्स्फूर्तपणाचं अनुकरणही करतात.
तिनं आतापर्यंत आक्रमणं, परतवली, झेलली, पेलली.. अनं पराभव पत्करूनही परत तितकीच उभारून आली.

धर्म म्हणजे.. वचन, शब्द देणं व मानणं, महाभारतातल्या महायुद्धानंतर धर्मराज युधिष्ठीराला द्रोपदीनं त्याच्या क्षत्रिय धर्माशी फारकत घेतलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण करून देणं...
पण तेच वचन, शब्द देणं व मानणं, पण, प्रतिज्ञा वा हट्ट आपलं वा कुणाचं भलं नं करता.. चुकीचं, नुकसान वा नाशाचं कारण बनत असेल.. तर तसं वागणं नं अनुसरलेलच बरं आणि इतिहासातून योग्य तेच शिकणं चांगलं...

धर्म म्हणजे फक्त आपल्या देवाला पुजणं आणि आपल्या संस्कृतीला, चालीरीतींना अनुसरणं नव्हे. धर्म म्हणजे दुसऱ्यांचाही आदर करणे व अनादर स्वत:हून नं करणं अनं रोखणं.. मग ती दुसरी व्यक्ती, संस्कृती वा ते दैवत स्वधर्माचं प्रतीक असो वा इतर धर्माचं...

धर्म म्हणजे चांगल्या विचारांचं, उच्चारांचं, आचारांचं शेवटपर्यंत केलेलं अनुसरण. ते केलं की जन्मभर शिकणं, वागणं अनं काम करणं.. सारेच सहज होतं आणि आपलीच मन:शांती शेवटपर्यंत कायम ठेवतं...

आजचं भारताचं युग हे स्त्रीपुरुष समानतेचं व बंधुतेचं आहे...
तरच भारत या देशात यादवीची व धर्माधर्मातील तेढीची सत्ताकेंद्रे नं उरता भारत हा विश्वशांतीच्या अश्वमेघ यज्ञाचा केंद्रबिंदू बनून खऱ्या समानतेचा आणि वैश्विक सलोख्याचा व सद्भावनेचा पुरस्करता व मार्गदर्शक बनेल...

मग आपापसातले सारेच भेद व गैरसमज.. मग ते नवराबायको, भाऊबंध, बंधुभगीनी, मुलंआईवडील, लहानथोर, कुणामधले का नं असेनात.. ते साऱ्या समज, गैरसमज, राग, रुसव्याचं अनं भांडणतंट्याचं कारण साऱ्यांनाच क्षुल्लक वाटायला लागेल.. अनं मनामनांतली अंधकाराची पटलं दूर होतील व अहंकाराचे वृक्ष कोलमडून पडतील...

© Prasad Thale