...

5 views

वाट नवी....
वाट नवी....

आयुष्यात आहे वाटा अनेक पण प्रत्येक वाट आहे नवी.
कोणत्याही वाटेवर चालायचं म्हटलं तर काटेरी झुडुपे चालताना अडथळा निर्माण करतातच.
पण ही काटेरी वाट चालत चालत, कधी फुलांच्या पाकळ्यांची मखमली चादर होते कळत नाही आणि मग वाटतं की वाट कधी संपूच नये.
आनंदाच्या वाटेत हळूच एखादा काटा जर रुतला तर ती वाटंच बदलल्या
जाते.
निवडलेल्या वाटेवर वळणं घेत, आत्मविश्वास मनात भरून फक्त समोर चालत रहायचं. किती ही कठीण वळणं असली तरी हिमतीने आणि युक्ती ने पार करायला हवं. अनोळखी जरी असली ही वाट, तरी ध्येय आपले आहे. हा प्रवास खूप गोड होत जातो, वेग वेगळे लोकांशी संवाद होतं, ओळख होते. अनुभव मिळत जातात. काही चांगले तर काही वाईट अनुभव ही मिळतात.
आपल्या आवडीचे फुले मिळतीलच असं होत नाही. जे फुल आपल्या वाटेत आलं त्याच्या सुगंध घेऊन, त्याच्या सुंदर रूप मनात साठवून समोर निघाव लागते.
आधी काटे मग फुलं, तर कधी फुलं मग काटे, असे होत होत ही नवी वाट आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते.

© kk_jazbaat
#motivational #writcostory #kk_jazbaat