...

2 views

एक नातं.. माय लेकिंच... part 1
मागच्या वर्षीची गोष्ट आहे, केरळ ला गेल्या असता तिकडे माझं फक्त दोन दिवसांच काम होत. ते झाल्यानंतर तेथून माझी रात्रीची फ्लाईट होती मी 5-6 तासांत मुंबई एअरपोर्ट वर पोहोचले तरी ही सकाळ झालेली नव्हती पहाटेची वेळ होती माझ्याबरोबर माझी आई व मोठी बहीण होती, टॅक्सी बुक करावं अस सगळ्यांचं मत होत पण काही कारणाने ती वेळेवर आली नाही व आम्हाला बुकिंग कॅन्सल करावी लागली.मामा पनवेल ला राहत असल्याने त्यांनी आमची चौकशी केली तेव्हा आम्ही त्यांना टॅक्सी ची वाट बघतोय अस सांगितल.मामांनी आम्हाला त्यानी त्यांच्या घरी यावयास सांगितले.शेवटी आम्ही अस ठरवलं की मिळेल त्या रिक्षेने मामांच्या घरी जावं, पण रिक्षा काही भेटेना!
योगा योगाने जेव्हा आम्ही एअरपोर्ट घ्या बाहेर आलो तेव्हा एसटी बस पनवेल कडे जाणारी उभी होती त्यात प्रवासी फार जास्तीचे नव्हते रात्र असल्याने शक्यतो एवढी गर्दी नसावी असा मी अंदाज बांधला. आम्ही बस घ्या वरच्या बाजूला सामान ठेवून दिले व नंतर पनवेल साठीचे तिकीट घेतले. मी आणि माझी मोठी बहीण आम्ही शेजारीच बसलेलो होतो, तसं म्हटलं तर बऱ्याचशा सीट रिकाम्याच दिसत होत्या पण आमच्या सीट च्या पुढे माय लेकी बसलेल्या होत्या. ती चिमुकली ५ वर्षांची असावी, गोरा व हसरा,
चेहरा लाल फ्रॉक घातलेलं ते अंधारात जास्त कळून येत नव्हत,
तिच्या हातात एक ग्रीटिंग कार्ड सारखे काहीतरी मला दिसत होते. तिची आई थोडी झोपेत होती. तिच्या आईचा चेहरा फार दमलेला दिसत होता जणू त्यांनी फार दूर चा प्रवास केला होता. त्या लहान मुलीच्या शेजारच्या पुढील सीट वर तिचा 7-8 वर्षांचा असलेला भाऊ बसलेला होता, ती त्याला सतत म्हणत होती '' भैया कल मम्मी को ये दूंगी उनके birthday पर" या वाक्य वरून मला कळाले की ते ग्रीटिंग कार्डच होत आणि ती चिमुकली स्केच पेनने काहीतरी नक्षीकाम करताना दिसत होती. तिने माझ्याकडे एकदा फार स्मित करून पाहिले उत्तरात मी ही तिला जरा हसऱ्या नजरेने पाहिले व म्हणाले ' अरे वाह कितनी अच्छी ड्रॉइंग कर लेती हो ' ती खुश होऊन मला म्हणाली '' दीदी ये सब मुझे मेरी मम्मी ने सिखाया है, और पता है कल उनका जन्मदिन है तो इसीलिए मैंने उनके लिए कार्ड बनाया। अच्छा है न? " मी म्हणाले 'बहुत सुंदर बिलकुल तुम्हारी तरह!' तिचं त्यावर च स्मित मला तिच्या मनात असलेलं
'थॅंक्यू' सांगून गेलं. त्या मायलेकी आमच्या बरोबरच पनवेल ला उतरल्या
मामांच्या घरी पोहोचल्या नंतर मी पाहिलं की...
#ToBe continue
©Vanshika Chaubey

© All Rights Reserved