...

3 views

आयुष्याचं गणित
आयुष्याचं गणित

कोणि बोलत नाही
कोणि विचारत नाही
कोणाला किंमत नाही
जगलो नाही तरी
कोणाला फरक पडत नाही
बोलणे झाले नाही
तरी काय वाटत नाही
रडलो तरी कोणाला दुःख नाही
जगतोय का मरतोय
काय फरक पडत नाही
आपलं असं समजून
घेणार कोणि नाही
काय होणार माहीत नाही
अशक्य झाले जगणं
जगणं म्हणजे
मरण येई पर्यंत वाट बघत राहणे

अश्या नकारात्मक गोष्टी पासून लांब ठेवायचं असेल तर आपल्या माणसासोबत आपले बनून राहा जीवन सुंदर आहे फक्त सोबत कोणीतरी पाहिजे .
जगणं सुंदर आहे सोबत जगायला कोणीतरी पाहिजे .
*नाते जपा आयुष्य जागा .*