...

1 views

बदनामी
घरचे लोक सतत लग्न कर म्हणून तगादा लावत...३०वर्षाची होतेस लग्न नाही म्हणतेस,लोकं आम्हाला नावे ठेवत आहेत.आता ही बदनामी नको वाटते..बदनामी म्हणजे काय?आणि तसही लग्न ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे पण यात बाहेरचेच लोक जास्त लुडबुड करतात मला हे पटत नाही...बदनामी म्हणजे काय?जे लोक तुमच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगायला तयार नाहीत,स्वत:च्या इच्छेप्रमाणे जगून पाहातात,हवं तसं जगतात,यथेच्छ फिरतात,प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात त्यांना ही लोकं वाईट वाटतात..जे लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे जगतात,त्यांच्या प्रत्येक गोष्टीला नंदीबैलाप्रमाणे होकार देतात ते लोक यांच्यासाठी चांगले असतात.त्याची आपण का पर्वा करायची..आपल्याला हवं तसं आपण जगायला हवं.लग्न ही बाब तशीही दुय्यमच पण मग एकाकी पडाल याची भिती हीच माणसे घालतात...तसाही आयुष्याचा प्रवास हा एकट्यानेच करायचा असतो तर अशा गोष्टींना काय घाबरायचे ,कशासाठी घाबरायचे....आणि आपल्या डोक्यात शेकडो कल्पना आणि असंख्य आठवणी रेंगाळत असतात..मग ते म्हणातात तशी एकटेपणाची भिती कुणाला आहे..?....शुभप्रभात...