...

6 views

पडझड
चार-पाच वर्षांपूर्वी झालेल्या जीवनातील प्रचंड अपघाताने अन खोल आत झालेल्या उलथापालथेनं,पुन्हा नव्याने जगायला शिकले. पण हा प्रवास सोपा नव्हता.आपण वरून दिसायला ठाकठीक दिसत असलो तरी आत झालेली पडझड दिसत नाही कैकदा.वेळ हा हातातील मुठीतून वाळू जशी निसटावी तसा निसटून चालला होता.वयाची पस्तिशी पार झाली पण म्हणावं तसं काहीच धुंडाळत आलं नाही. चांगलं-वाईट समजायला लागलं पण हे कळायला वयाचा फार मोठा टप्पा पार करावा लागतो हे उमगले.अन लक्षात आले 'आपणच आपल्यासाठी उभे राहायला हवे'.आपल्या हातून झालेल्या चुका,फोल ठरलेली नाती अन झालेली फसवणूक याची सल बोचत होती.जळून राख झालेल्या घटना की ज्याच्या धुरात आपण आजही चाचपडत जगत आहोत. आयुष्य थांबून गेल आहे.काहीच करावसं वाटत नाही.कित्येक दिवस निराशेत गेले.अजून त्यात वजन वाढण्याची भर.पण यातून बाहेर पडणे खूप गरजेचे होते. दुःखाचा सोहळाही ओसरला होता पुन्हा नव्याने काहीतरी करावंसं वाटू लागलं.आतली झालेली पडझडीची डागडुजी करून नवीन कामाला हात घातला.तो याच विचाराने की आता बस्स!आता आपणच आपल्यासाठी उभे राहायला हवे, बरोबर ना...आजची आशावादी सकाळ..शुभप्रभात..
© भद्रकाली