...

4 views

एक नातं माय लेकीच.. पार्ट 3
संध्याकाळ झाली ...माझी झोप झाली होती. थोड्या वेळा साठी मी घडलेली ती गोष्ट विसरून गेले होते. उठल्यानंतर मी बाल्कनीतल्या खुर्चीत जाऊन बसले. मी चहा घेत नसल्यामुळे मामी ने कॉफी आणून दिली. मी शून्यात पाहत होते पण चटकन ती बेडरूम मध्ये घडलेली घटना समोर आली पण मी तेव्हा घाबरले नाही. मी वाट पाहत होते की जेव्हा ती तिघे जण मला पुन्हा दिसतील मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करेल. त्यांची अडचण काय आहे किंवा ते माझ्यामागे का लागली आहेत मी विचारेल. असा मी दृढ निश्चय केला.
मामाची सोसायटी हायवे रोड ला लागून होती आणि बाल्कनीतून रस्त्यावरची रहदारी दिसायची. मी तसंच पाहत बसले होते. थोड्या वेळाने मी हाॅल मध्ये जाऊन बसले. मामा ही तेथे होते ते आईशी गप्पा मारत बसले होते. त्यात मला असं काही ऐकू आलं ज्यामुळे माझं मन अजूनही हळवं झालं. आई मामांना म्हणाली ''दादा बरं झालं कि पहाटे ती एसटी बस पनवेल कडे येणारी मिळाली, नाहीतर आम्ही कधी येथे पोहोचलो असतो‌ किंवा किती वेळ लागला असता कोणास ठाऊक!'' मामा आश्चर्याने म्हणाले '' काय म्हणतेस गं पहाटे एअरपोर्टवरून पनवेलकडे एक ही एसटी बस येत नाही. आली तरी ती सकाळी 9च्या आसपास येते." तेव्हा मला समजून आले की त्यात प्रवाशांची गर्दी का नव्हती. माझ्या मनात सर्व काही जाणून घेण्याची आतुरता निर्माण झाली. मी पुन्हा बाल्कनीत जाऊन उभी राहिले, तेव्हा माझ्या मागे कोणीतरी व्यक्ती उभी आहे असे वाटले मी वळून पाहिले तर त्या माय लेकी उभ्या! पण त्यांच्या बरोबर तो मुलगा नव्हता.
मी सर्रास तेथून पळायचा प्रयत्न केला पण माझ्याने माझे पाय हलवेना मला ते जड वाटू लागले. मी शेवटी निश्चल उभी राहिली आणि त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. मी माझ्या जीभेला उचलायचा प्रयत्न करत होते. पण तिला जणू हलायचंच नव्हतं. मी हिम्मत करून त्या ठेवलेल्या खुर्चीवर बसली. त्यांच्यापासून नजर वळवली नाही. मी निर्भय होऊन म्हणाले ''काय हवंय तुम्हाला? का माझा पिच्छा सोडत नाही तुम्ही? काय अडचण आहे? आणि तुम्ही कोण आहात?'' मी त्यांच्यावर प्रश्नांचा वर्षाव केला पण ते काही बोलेना! शेवटी ती चिमुकली माझ्या जवळ आली 'दीदी डरो नहीं हम कुछ भी नहीं करेंगे|आपको पता है हमने आप सबको‌ उस बस में बैठने‌ के लिये मजबूर क्यों किया? आपकी टॅक्सी को‌ लेट क्यों‌ कारवाया? चलिए मैं बताती हून क्योंकि हमें आपसे बात करनी ती आप ही हमारी मदत कर सकते हो.'' पण हे सर्व मी ऐकत असताना आई आली तेव्हा ती दोघे तेथून निघून गेली आणि त्यांचं बोलणं अपूर्ण राहिलं...
मी रात्री बेडरूम मध्ये एकटी असताना...
© All Rights Reserved
#toBecontinued
© Vanshika Chaubey