...

3 views

अश्वतथामा
आज आईशी बोलतांणा सहजच 'अश्वतथाम्याचा' विषय निघाला,आई मला हिमालयात जावसं वाटतं अश्वतथाम्याला भेटायला म्हणे तो जीवंत आहे आजही.
माझी आई फार साधी आहे अन खूप काही शिकलेली नाही ती हसतच बोलली 'त्यासाठी हिमालयात कशाला जावं लागत मला तर येथेच अनेक अश्वतथामा भेटतं असतात,अग हे काळजात अनेक जखमाचं दु:ख घेऊन फिरणारी माणसंच तर अश्वतथामा आहेत..
अन तू हिमालयात कशाला शोधायला जातेस?
अग मला त्याच्याकडून ती कला शिकायची आहे जखम घेऊन जगण्याची यावर आई पुन्हा तशीच हसते खळखळून लहानपणी मला गोष्ट सांगताणा हसायची ना अगदी तसी 'जया' तुला एवढही कळत नाही इतकी शिकलीस तरी अग जखमांच दु:खच तर अनेक कला जन्माला घालते...कोणी तरी आपल्या वेदनेवर फुंकर घालावी म्हणून अश्वतथामा आजही भटकतो म्हणे...म्हणजेच उराववर एवढ दु:ख घेऊन आजही हजोरोंच्या संख्येने माणसं भटकतात,फिरता कुणीतरी त्यांच्या जखमेवर ,वेदनेवर फुंकर घालेलं म्हणून.....
अन यावर आम्ही दोघी विशन्नतेने हसतो गलावर अश्रू ओघळेपर्यत...........शुभप्रभात
📖✍