...

11 views

देव असतो
देव तसा भेटत नाही..
म्हणून काय त्याचं अस्तित्व मानायचं नाही...

देवाकडून काही का मागावं..
जर आपण त्याला काही देतच नाही...

आणि वाहीलं श्रद्धेचं फुल तरी..
आपण देवावर उपकार करत नाही...

देव असतो भक्तांवरही सदा प्रसन्न..
पण माणसालाच समाधानी रहाता येत नाही...

देवानं सोडलंय आता कलीयुगात येणं..
पण माणसानेही सोडलंय चांगलं वागणं...

पडलाय माणूस मागे.. द्वेष, कटूता अनं तिरस्काराच्या..
मग करतो गोष्टी अनं थट्टा देवाकडून उद्धाराच्या...

देव तसा भेटत नाही..
पण त्याचं मन माणसाइतकं कोतं नाही...

वर्तमानात जगून त्यानं..
झालं, गेल्यासाठी कधीच दोष दिला नाही...

माणसाच्या मनात तेव्हाच देव वसेल..
जेव्हा धर्म अनं कर्मात कुठलीच गफलत नसेल...

© Prasad Thale