...

0 views

आजोबा ...
लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं ,
गरुबिमध्ये बालपण गेलं ,
काम करून शिकले अन् गावातले ,
पहिले अधिकारी झाले ..

नाव आहे राम अन् रामासरखा.
स्वभाव अन् वृत्ती ,
आईची आयुष्यभर सेवा अन् शब्द जपला ,
भावांना शिकवून मोठं केलं,
अन् त्यांच्या मुलांची जबाबदारी पार पाडली ....
असे माझे आण्णा .....


चेहऱ्यावर आहे त्यांच्या तेज ,
अन् स्मित हास्य असत कायम ,
स्वभाव अन् वागणं शांत ,
ज्यांच्यमुळ आहे अस्तित्व माझ आज ...

प्रत्येक अडचणीत दिली साथ ,
न कधी सोडला. नाही हाथ ,
तुमच्यामुळ शिकलो आम्ही आज ,
असे तुमचे लाख मोलाचे उपकार ....

माझ्या आयुष्यात आहे जागा तुमची खास ,
वडिलांची जबाबदारी पार पाडली तुम्हीच ,
नकोष्या वाटणाऱ्या आयुष्याला दिली तुम्ही वाट ..

सर्वांचं केलं चांगल पण ,
मुलं दिली नाही कधी साथ ,
पण आम्ही आणू दिवस ,
तेंव्हा तुम्ही घेताल चिंतामुक्त श्वास ....

सगळीकडे तुमचंच नाव आहे ,
खूप काही कमवल ,
तुमची तोडील अन् जोडीला नाही कुणी ,
त्रास सहन करण्याची शक्ती आहे ज्यांची फार ...
असे माझे आजोबा ....

कमी अन् मुद्द्याच बोलणं ,
भगवद्गीतेचा विचाराप्रमान जगणं ,
शरीराने आहेत कणखर ,
जे असेल की शांत वाटते आयुष्यात ,
असे माझे आजोबा ....

गरिबीची ठेवली जान ,
पैशाने अन् मनाने आहेत श्रीमंत ,
चिकाटी वृत्ती अन् हळवं मन असणारे ,
निस्वार्थी त्यागमुर्ती असणारे माझे आजोबा ...


तुमची नात ,
राजनंदिनी लोमटे ..