...

4 views

जाताना प्राण माझा
"जाताना प्राण माझा हळू हळू जाऊदे
एक फक्त तुझीच स्मृती सोबतीला राहूदे

सोडून आलो सगळे जपण्यासारखे फारसे नाही
शेवटाला बरोबर नेण्यासारखे फारसे नाही
तुच आहे मनामधे, उरली फक्त जाणीव तुझी
क्षण तुझ्या बरोबर घालवलेले सोबतीला राहूदे

मिटून गेल्या इच्छा मिळण्यासारखे फारसे नाही
शेवटाला आता काही मागण्यासारखे फारसे नाही
तूच सत्य जीवनाचे, भासते फक्त उणीव तुझी
मी प्रेम तुझ्यावर केलेले सोबतीला राहूदे

गेले आयुष्य सारे सांगण्यासारखे फारसे नाही
आता शेवटाला साजरे करण्यासारखे फारसे नाही
राख होणार सगळे, सुरु होणार प्रवास नवा
तुझी संवेदना आत्म्याच्या सोबतीला राहूदे"
- पिनाकिन
@Pinakin
© Pinakin