...

25 views

कुणासाठी तरी असू...
आज आहोत , उद्या नसू
चल कुणाचे अश्रू पुसु.!!
स्वतःसाठी जगता जगता
कुणासाठी तरी असू..!!
रडतांना दिसलेच कुणी
चेहऱ्यावर त्यांच्या आणू हसू..!
स्वतःसाठी जगता जगता
कुणासाठी तरी असू..!!
माझे माझे करीत बसलो
दुसऱ्याचे मग कधीच नसू..!!
आपण, आपल्या संपून गोष्टी
त्याच्याजवळ थोड बसू...!!
हाच जन्म , एवढेच जीवन
पुन्हा आपण कधीच नसू..!!
स्वतःसाठी जगता जगता
कुणासाठी तरी असू...
@Yogita chavan@
##Thank you so much#
© lovestory poetry