...

2 views

स्त्री लढेल स्त्री लढणार स्त्री लढत राहिल
स्त्री आहे का काचेचं भांडं त्याच्यात पाहत राहावा का तिने तिचा चेहरा

का सावरा तिने खांद्यावरचा पदर आणि झोकून द्यावि का जमिनीकडे नजर

स्त्रीच चारित्र म्हणजे पांढरा कागद त्यांच्यावर शाहिचा डाग पडला की तो टाकला जातो चुरगळून

स्त्री यांना तेवढं चारित्र का प्रत्येक पुरुष असतो का पवित्र

स्त्री आहे एक लक्ष्मी, सावित्री,पार्वती पण त्याही पुढे जाऊन ती आहे दुर्गा, झाशी ,जिजाऊ

तिची नजर खाली नाही वर असेल त्यात उद्याचा नवा सुर्य दिसेल
ति लढायला नाही हरवायला तयार आहे आणि एक स्त्री म्हणून मिरवायला तयार आहे

स्त्री म्हणून कधी नाही भीती कोणी आलं की लढायला असेल उभी पदर खोचून आणि ठोकून छाती

स्त्री लढेल स्त्री लढणार स्त्री लढत राहिल आणि ते सर्व विश्व पाहिलं
कवयित्री पल्लवीराणी