...

22 views

पिताच्या ह्रदयात हळूच डोकावून पहायचे ..
तो काही बोलत नाही,
सर्व काही ह्रदयात ठेवी,
मनातल्या मनात रडत राही,
ह्रदयात त्याच्या दडले आहे खूप काही,
म्हणून पिताच्या ह्रदयात हळूच डोकावून
पहायचे...

वाटतो तो नेहमी कठोर,
पण तो कधी होतो भावविभोर,
त्याचे मन असते पुष्पाहून कोवळं,
नेहमी माझ्यासाठी करतो तो धावपळं,
म्हणून पिताच्या ह्रदयात हळूच डोकावून पहायचे...

कधी रागाच्या भरात खूप काही बोलून जातो,
कधी कधी तो गहिवरून येतो,
एकटे असताना ह्रदयातल्या ह्रदयात
अश्रू ढाळतो...
ह्रदयात त्याच्या दडले आहे खूप काही,
म्हणून पिताच्या ह्रदयात हळूच डोकावून पहायचे...

दुःखांचे पर्वत गाठतो,
माझ्या स्वप्नांसाठी सारे आभाळ मोकळे करतो,
बोलता बोलता कंठ माझं दाटून येतं.,
कोण म्हणतो तो कठोर आहे,
ह्रदयात त्याच्या प्रेमाचे महासागर वाहे..
कधी वाटते त्याचा राग अनावर आहे,
पण त्याच्या प्रेमाचा,शिकवणीचा कुठे पारावार आहे,
ह्रदयात त्याच्या दडले आहे खूप काही,
म्हणून पिताच्या ह्रदयात हळूच डोकावून पहायचे...

रागाने तो नाही,
त्याची काळजी बोलत असते,
त्याची मूर्ती माझ्या मनात ठसते,
तो जरी बोलत नसला,
तरी त्याचे डोळे सांगतात,
त्याच्या बोलणीत ही प्रेमाचे अमृत वाटतात,
ह्रदयात त्याच्या दडले आहे खूप काही,
म्हणून पिताच्या ह्रदयात हळूच डोकावून पहायचे...

माझ्या काळजीत तो स्वत:ला विसरतो,
एवढी ताकत तो कोठून आणतो??
प्रेमाचे अमृत तो साठून ठेवतो,
मला सर्व सुख देऊ पाहतो,
ह्रदयात त्याच्या दडले आहे खूप काही,
म्हणून पिताच्या ह्रदयात हळूच डोकावून पहायचे...

अश्या या माझ्या देवतेला काय म्हणायचे?
म्हणून पिताच्या ह्रदयात हळूच डोकावून पहायचे....!!!

Written by VANSHIKA CHAUBEY
#writcopoemChallenge