...

5 views

लाॅकडाऊन परत सुरू होतंय रे देवा

लाॅकडाऊन परत सुरू होतंय रे देवा

आमच्यासारखे तर जगून घेतील रे
पण त्या रस्त्यावर फुगे विकणाऱ्याचे काय
फुगे विकून स्वतःचे पोट भरायला
आत्ता त्या सामसूम रस्त्यावर तो एकटा करणार तरी काय

लाॅकडाऊन परत सुरू होतंय रे देवा

आमच्यासारखे तर जगून घेऊ रे
पण त्या गाडी खेचणाऱ्याचे काय
त्या थकलेल्या खांद्यांनी निभावल्या जबाबदाऱ्या
पण आता त्याच्या परिवाराचे काय

लाॅकडाऊन परत सुरू होतोय रे देवा

आमच्यासारखे तर जगून घेऊ रे
पण त् mlया स्टेशन वर पेन विकणाऱ्याचं काय
चार पेन विकून दोन रुपये कमावणारा तो
आता त्याचे निभावणार तरी कसे काय

लाॅकडाऊन परत सुरू होतंय रे देवा काही तरी कर

आमच्यासारखे तर जगून घेतील रे
पण त्या हातावर पोट असलेल्यांचे काय
जरा लक्ष ठेवा त्यांच्यावर करण त्याचं
तुझ्या शिवाय दुसरं कोणीच नाय

सोहन भूषण राऊत




© Sohan Raut