...

1 views

✨आजी ✨
लहान असतानाच आई - वडिलांचं छत्र हरवलं ,
भावाने लहानच मोठं केलं ,
गरिबितीच लहानपण गेलं ,
अन् लहानपणीच लग्न झालं ...

मायेची आस ,आपुलकी कधी भेटलीच नाही ,
सतत शिस्त ,मर्यादेतच रहावं लागलं ,
संसार सुखाने चालला होता ,
दुष्काळाचं दिवस चालू होते ,
गरीबितीच ,निम्मं आयुष्य निघून गेलं ..

काही दिवसाच सुख ,अन् नवराही देवाघरी गेला ,
आता जगायच कस हा प्रश्न उमगला ,
पाच मुलांचा संभाळ केला ,मोठं केलं ,
भावाच्या मुलांचीही यांनीच जबाबदारी पार पडली...

कोणाचा आसरा नव्हता , न दिलासा नव्हता ,
एकट्या स्त्रीवर सगळा संसार चालू होता ,
संकट येत होती ,पण सामोरी गेली ,
कष्ट करून मुलींची लग्न अन् मुलाला ,
स्वतच्या पायावर उभ केलं ...

एक अडाणी स्त्री असून ,
कोणाची मदत घेतली नाही ,
सर्व काही करून दाखवलं ,
लहाणपनापासून दुःख होत तरी ,
सुखाची आशेने जगात राहिली ...

स्वभाव तिखट आहे ,पण मनात माया आहे ,
बोलून वाइट होते ,पण मनात पाप नाही ,
सर्वांचं चांगल व्हावं असा मनी भाव असणारी ..
माझी आजी

चिकाटी अशी वृत्ती आहे ,
मायेनं वागणं आहे ,
संस्कार अन् सगळ काही देणारी ,
आई पेक्षा सर्वश्रेष्ठ स्थान असणारी ,
माझी आजी आहे ....

तुमची नात ,
राजनंदिनी लोमटे..