...

2 views

तुझ स्त्रीत्व...
तुला समजून घेणे खूप अवघड आहे,
कधी तु वागतेस खट्याळ - खोडकर
तर कधी राग नाकावर ऊभा आहे
वीरांगने सारखा बेदरकार...
तु वीरांगना बनणे किंवा असणे
आजही या समाजाला मान्य नाही,
तुझ्या विचार-व्यक्ती स्वातंत्र्याची सीमा
आजही चार भिंतीच्या बाहेर नाही.
पुरुषप्रधान देशात या आज अजूनही
तुझ्या स्त्रीत्वावर खुले आम घाला घातला जातो
परस्त्रीला मातेसमान माना हा धडा
फक्त "शाळा-कॉलेज" च्या चार भिंतीतच राहून जातो...
तुला "अबला" वा "ओझ" म्हणून मारल किंवा विकल जात
असा काय केला गुन्हा म्हणून आयुष्याभर मनात सलत रहात...
तुझे स्त्रीपण कोणाला कधी उमजलेच नाही
तुझ्यातील निरागसपणा कधी कळलाच नाही,
आयुष्यभर तु सर्वांसाठी झटत राहिलीस
पण तुझी सत्वपरिक्षा कधी संपलीच नाही.

© _backpage_stories