...

11 views

असतील बरेच देव
द्वार उघडं नसतं नेहमी मंदिराचं..
पण मनात मात्र त्याचं स्थान अढळ असतं...

आपणंच मनाची सारी कवाडं उघडी ठेवावी,
अनं माणसं विचारांनी नेहमी जोडत जावी...

मग जुळतील वा परत एकवटतील सारी नाती,
अनं सुख, समाधानानं कुटूंबं ओथंबून जाती..

दार असतं एक मुख्य प्रत्येक घराचं,
पण वडीलधाऱ्यांशिवाय त्यातलं घरपणही उदास वाटतं...

असतील बरेच देव वस्तीला त्या कित्येक वृद्ध आश्रमात,
त्यांच्या संस्काराचं महत्त्व पुढच्या पिढ्यांना कळावं...

त्यांच्या अपार कष्ट, आशिर्वादांचं ऋण,
अनं सेवेचं पुण्य कुणी मोठेपणी नं विसरावं...

© Prasad Thale
---
#digital
#poetry
#poem
#marathi
#marathikavita
#marathipoems
#inspirational
#writco
#writcoapp