...

15 views

कविता...
विघ्नहर्ता गणेशा
​आगमन तुझे संसारी
​सार्वजनिक उत्सव जरी
​कौतुक तुझे घरोघरी...
​वास्तव्य तुझे घरात
​जणू चैतन्य मना मनात..
​दारी मांगल्याची आरास
​वडीलधाऱ्यांचा अमूल्य सहवास...
​धार्मिक श्रद्धेतील कोंदण तू
​कौटुंबिक आनंदातला बहर तू...
​निरोप तुला देतांना
​नकळत डोळे पाणावतात...
​तू परत येण्याच्या वचनाने
​मात्र आनंदाश्रुंनी सुखावतात...
​विद्येचा तू बुद्धिदाता...
​चौदा विद्या आणि ​
​चौसष्ट कलांचा...
​आनंद घेणारा नि देणारा
​रसिक तू विघ्नहर्ता...
​विघ्न येता भारी भक्तांवर
​संकटात समचित्त ठेवण्या...
​बुद्धिला मार्ग दाखवणारा प्रेरक तू
​साऱ्या जगावर संकट....
​कोरोना विषाणूचे
​त्याच प्रेरणेची आज गरज...
​प्रयत्न संसर्गाला घालवण्याचे
सर्व ​सिद्धीस जावे कार्य...
​मानवजातीने करावे सत्कार्य
​तुझ्याच प्रेरणेचा उपाय हा छोटा...
​तुझ्या कृपेवर साऱ्या मानवाचा वाटा
​तुझ्याच भक्तीपोटी...
​सोशल डिस्टन्स ठेवत टाळावी गर्दी
​नाही तर लॉकडाऊन परत...
​प्रवेश करत जीवनात देईल वर्दी
त्या ​मागोमाग आर्थिक चणचण...
​बाप्पाला ना आवडे भक्तांची ती वणवण
​तेव्हा कर्म सुमनांची करावी उधळण...
​प्रसन्न होईल आद्य गजानन
​मास्क घालणं,स्वच्छता राखणं...
​गर्दी टाळणं हेच कर्म पूजन
​प्रसन्न चित्ताने त्यास त्रिवार नमन...

​ शोभा मानवटकर....











© All Rights Reserved