...

2 views

❤️✿⁠ भाऊ⁠✿❤️
नाही पाहिजे हिस्सा भाऊ
माहेर माझं संपत्र ठेव,
रक्षाबंधन भाऊबीजेला
मनात माझी प्रतीक्षा ठेव...
भेट वस्तू वगैरे काही नको
आपलं प्रेम कायम ठेव,
आपल्या घरी सदैव माझी
आठवण मात्र साठवून ठेव.......
सर्वांच्या मनामध्ये
माझा मान राखून ठेव,
मुलगी आहे या घरची
हा सन्मान कायम ठेव......!
© Tinu bhujade