...

1 views

भारतीय सेना
जय जवान, जय किसान,
भारतीय सेना आहे,
म्हणून तर आम्ही खुशाल...!

आईच्या उदरात जन्म घेतला तरी,
त्याच आईने शप्पत घातली
भारत मातेचे रक्षण करण्यापरी....!

घरांदाराच्यात हरवुन गेले तरी,
भारतमातेच्या रक्षणाकरता
जवान निर्भय होवून सेवा करी...!

दुश्मन सतत बनुन राहतात यमराज,
अन् थरथर कापून जातात
जवानांचा ऐकून आवाज....!

जीवाची पर्वा कधी न करता,
भारत मातेचे रक्षण करतात
घरादारांची भीडभाड न राखता....!

कधीच नसतो त्यांना सण,
फक्तं देशाचा विचार करतात
हे जवान सारेजण.....!

गोळ्या जेव्हा सीमेवर येतात,
पहिली गोळी हेच खातात
अन् देशासाठी शहीद होतात....!
                                  भारतीय सेना
                                 मनिषा मिसाळ ( लोखंडे)