...

11 views

"बेधुंद"
मृगाच्या या सांज वेळी,
अकल्पित उजाडले.
तन भिजलेले पाहून,
मन माझे मोहरले.
कल्पनेहुनही सरस योवना,
अधर ओलावलेले.
नशिली नजर,
मादक काया,
घन हे काळोखले.
स्वप्न सुंदरीची ही रचना माझी,
समोर ती उभारली.
बेधुंद होऊनी,
घेतले कवेत मजला,
मग ती रात्र शहारली.

© Shivaji