...

8 views

माया...
कोणी तरी असावं काळजी करणार
रस्त्याकडे डोळे लावून वाट पाहत बसणार
गाडीचा आवाज घेऊन दरवाजात उभ राहणार
तर कधी वेळ होईनही पोचले नाही घरात,
म्हणून फोन करणार
जेवताना प्रत्येक घासा सोबत आठवण काढणार
सोबत जेवताना हवे नको ते खायला घालणार
झोपताना कुशीत घेऊन झोपणार
मायेचा हात हळुवार पणे डोक्या वरून फिरवणार
बाजारात गेल्यावर खाऊ आणणार
भरलेच कधी डोळे तर पदराने पुसणार
सतत काळजी करणार
भर भरून माया व प्रेम करणार......