...

3 views

सृजन ठेवा
*श्रावणमास विशेष...१३*

*रोज एक ‌श्रावण कविता...*


१३) *सृजन ठेवा*

काव्यप्रकार..पंचाक्षरी...


*सृजन ठेवा*

भावभावना,
चराचराच्या,
नाते हळवे
श्रावण घाली,
पहा मोहिनी,‌
येता शिरवे..!

सोमवारची,
शिवामुठ ती,
कृपा हराची
सुख समृद्धी,
सौख्य कामना, पुजा शिवाची...!

मंगळवारी,
मंगल गौरी,
अक्षय दान
सौभाग्य दायी,
व्रत वैकल्ये,
मंगल वाण...!

बुधवारची,
कथा कहाणी,
पुजा बुधाची
सुख दुःखाची, प्र
वास यात्रा,
जोड सणांची...!

गुरवारची,
बृहस्पतीची,
करू साधना
श्रावण सांगे,‌
मंत्र सुखाचे,
सरे यातना...!

पुरण पोळी,
जिवती पुजा,
खाऊ फुटाणे
नव्या पिढीला,
औक्षण होई,
नेत्र दिपाने...!

मुंजा भोजन,
पुजा आरती,
हनुमंताची
श्रावण लावी,ओ
ढ जिवाला,
भाग्य क्षणांची..!

रविवारीही,
सुर्य पुजेचा
श्रावण साज
अमर्याद हा,
श्रावण सिंधू,
सुरेल गाज...!

सात दिसांचे,
सात सोहळे,
चलनी नाणी
गुज मनीचे,
आठव लेणे,
श्रावण गाणी...!

आला श्रावण,
सवे घेऊनी,
प्रभावळीला
वसा भक्तीचा,
सृजन ठेवा,
सणावलीला...!*विजय यशवंत सातपुते पुणे*
© All Rights Reserved