...

2 views

पतंग
तिचा जन्म होतो आणि घरात लक्ष्मी आली म्हणून उत्सव साजरा होतो

तिच्या गोड बोलीने, तुरु तुरु वावरण्याने घर नंदनवन होत

तिच्या अवतीभोवती असतात सगळे सज्ज, ती सुद्धा असते आपल्या जगात गर्क

दिवसा मागून दिवस जातात, अल्लडपणात आयुष्याची स्वप्न रंगतात

स्वतःत मग्न असलेली ती विसरत नाही आई बाबांची शिकवण आणि एक दिवस मोकळ्या आकाशात घेते झेप

असतात खाचखळगे तिच्याही रस्त्यात पण हिम्मत हारण नसत तिच्या रक्तात कारण संस्कार असतात तिच्यावर आपलं स्थान बळकट करण्याचे या जगात

आई बाबांचा अभिमान असलेली पणती उजळते सासरचे पण तिच्याच अस्तित्वाने फुललेले तिचे दुसरे घर

विचार येतो, काल अल्लड पणे हवेत झुलणारी पतंग आज मांजा बनून कशी सामोरी जात आहे त्या वाऱ्याच्या झंजावाताला

अस्तित्व टिकवून आणि अस्तिव फुलवून...
© hsk