...

1 views

श्री शिवाजी महाविद्यालय
जगदाळे मामा आहेत संस्थापक ,
शिवाजी महाराज आहेत आदर्श ,
एकमेका साह्य करू ,अवघे धरू सुपंथ,
हे महाविद्यालयाच ब्रीद वाक्य ,
अस आपल श्री शिवाजी महाविद्यालय ....

प्रवेश करताच होतो नतमस्तक ,
महाविद्यालयाचा वाटतो अभिमान ,
कारण शिवाजी महाविद्यालय
म्हणजे आमचे प्राण .....

कुणी नाही दिली छाया ,
तेव्हा महाविद्याल याने दिली छाया अन् माया ,
नको वाटणारा प्रवास ,
आता झाला आवडता ,

स्वर्गाहून आहे सुंदर , अस शिवाजी महाविद्यालय
देवासारखे आहेत सर्व शिक्षक ,
अनमोल अस ज्ञान देतात,
त्यांचं उपकार शब्दात न तोलता येणारे

DBT star college आहे आपल ,
शिवयुग हा ग्रंथ महाविद्यालयाचा,
"शिवाजी द बॉस " या नावाने ओळखलं जातं ,
सर्वगुणसंपन्न बनतो विद्यार्थी ,
अस आपल श्री शिवाजी महाविद्यालय ...

शिवाजी महाविद्यालयात आल्यावर समजत ,
सर्व आहेत समान ,
संस्कार ,संस्कृती जपली जाते जिथे ,
अस आपल श्री शिवाजी महाविद्यालय.

सौभाग्य आहे आपल,
प्रवेश महाविद्यालयात घेतला ,
आता मन रमेना आपल ,
अस आपल श्री शिवाजी महाविद्यायलय

गरीब मुलाचं भविष्य झालं उज्जवल ,
हातात नव्हता रुपया ,
आता लाखो लागले कमवू ,
अस आपला स्वर्ग,
श्री शिवाजी महाविद्यालय ....

राजनंदिनी लोमटे