...

8 views

शब्दाविना
शब्दाविना आहे सर्व जग अधुरे
कसे हे जगणे शब्दाविना खरे

शिक्षणाची पहिली पायरी शब्द
अ-आई शब्दाविना मन ही झुरे

भावना, ज्ञान यांचेच व्यक्तीमत्त्व
शब्दाविना होईल का हे सर्व पुरे?

बाळाचे ते बोल, आजीची कथा
शब्दाविना अंगाई तरी कुठे उरे?


© Soman