...

0 views

स्त्रीची कर्मकहानी......
जन्म होताच आनंद झाला ,
लक्ष्मी आली असा जागर झाला ,
आईच्या कुशीत बाळ आल ,
त्रीलोकी सुख लाभलं त्याला ,
ती एक स्त्रीचं होती ..

पैजनचा आवाज घुमू लागला ,
आई - बाबांचा चेहरा हसून उठला ,
शाळेचा दरवाजा उघडला ,
सावित्री बाई नी सहन केलेला त्रास दिसला ,
शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरल्या ,
ती एक स्त्रीचं होती ..

वयप्रमान शिक्षणाची पायरी वाढत गेली
स्वराज्य प्रेरीका जिजाऊ - शिवबाचा इतिहास कळला,
तारबाईनी औरंगजेबाला गाडल ,
लक्ष्मीबाईनी वाचवली झाशी ,
असा इतिहास कळू लागला,
त्या ही एक स्त्रीचं होत्या..

मोठी झाली पोर आता ,
समजाची वाढली चिंता ,
लग्न करावे पोरींचे आता ,
वय वाढूनी जाता ,
लावील पोर कपाळी टिक्का,

सुशिक्षित झाली मुलगी ,
संस्काराचे प्रतीक जपली ,
चूल अन् मूल बंद झाली प्रथा आता,
अवकाश यानातून फिरली कल्पना चावला ,
ती एक स्त्रीचं होती ..

जगाचा नियम कुणाला टळला,
हात झाले पिवळे आता ,
दोन्ही घराची ज्योत टिकवली ,
सुशिक्षित असूनही संसार अन्
नोकरी सांभाळली ..

वडिलांचा अभिमान तू ,
भावाची हितचिंतक तू ,
मुलाच्या जीवनाचा शिल्पकार तू ,
...

राजनंदिनी लोमटे




© All Rights Reserved