लहानशी सावली...
मन तिचं बेभान पाखरू,
कधी कधी वाटतं कसं तिला आवरू....
थोडीशी अल्लड अवखळ
प्रेमाने घेते सर्वांना करून जवळ...
नेहमी मला विसावा देते तिची लहानशी सावली,
माझी ही चिमणी नेहमी माझ्या संगे धावली...
सर्वांना ती करून घेते आपलंसं,
लहानग्यांसारखी वागते,
वेळीस समंजसपणा ही दाखवते,
तिची लहानशी सावली नेहमीच जणू माझ्या संगे...