कन्यादान
का करावं लागते प्रत्येक बापाला कन्यादान?...
पोरीचं केलं कन्यादान तरचं मिळतो का मान?...
का आहे इतकं महत्व फक्त लग्नाच्या बाजारात?...
का ते पाहण्यासाठी लोक येतात हजारात?...
करुनी कन्यादान मिळेल त्याला सम्मान जगी...
पण का करत नाही आपल्या कन्येचा विचार मनी...
कशी राहिल ती त्या आजाण जागी...
करुनी तिला लहानाच मोठ्ठ...
केला पूर्ण तिचे सगळे हट्ट...
वाहिला तिची काळजी, झेलल्या तिच्या चुका वेळोवेळी.
पण का करतो तो तिला दान दुसऱ्याच्या तळी...
का म्हणतो नेहमी तिला पराया धन...
आणि तो म्हणे एक संभाळणारा तन...
का आहे कन्यादान ही रित प्रचलित...
का आहे ही प्रथा संकलित...
कन्यादान केला तरचं होईल ती कल्याणी...
का करतो असा विचार हा समाज मनोमनी...
का नाही होत या जगी पुत्रदान..
का करतो हा समाज नेहमी कन्यादान..
खरं तर तिला समजतात अडगळ माल..
कळते तिला हे सर्व चाल...
आहे तिला सगळं ठाव..
काय आहेत या जगीचे भाव..
खरं तर कन्यादान आहे एक खराब प्रथा..
जिथे होतो एका जीवाचा सौदा...
करू नका तिच्या मना विरुद्ध जबरदस्ती..
ती आहे एक जिवंत हस्ती...
बदला तुम्ही तुमची विचारसरणी...
ती आहे स्वतःची हिरकणी..
नको तिला कोणी तिच्या आयुष्याचा चालक...
ती आहे तिच्या आयुष्याची मालक...
© Miva
पोरीचं केलं कन्यादान तरचं मिळतो का मान?...
का आहे इतकं महत्व फक्त लग्नाच्या बाजारात?...
का ते पाहण्यासाठी लोक येतात हजारात?...
करुनी कन्यादान मिळेल त्याला सम्मान जगी...
पण का करत नाही आपल्या कन्येचा विचार मनी...
कशी राहिल ती त्या आजाण जागी...
करुनी तिला लहानाच मोठ्ठ...
केला पूर्ण तिचे सगळे हट्ट...
वाहिला तिची काळजी, झेलल्या तिच्या चुका वेळोवेळी.
पण का करतो तो तिला दान दुसऱ्याच्या तळी...
का म्हणतो नेहमी तिला पराया धन...
आणि तो म्हणे एक संभाळणारा तन...
का आहे कन्यादान ही रित प्रचलित...
का आहे ही प्रथा संकलित...
कन्यादान केला तरचं होईल ती कल्याणी...
का करतो असा विचार हा समाज मनोमनी...
का नाही होत या जगी पुत्रदान..
का करतो हा समाज नेहमी कन्यादान..
खरं तर तिला समजतात अडगळ माल..
कळते तिला हे सर्व चाल...
आहे तिला सगळं ठाव..
काय आहेत या जगीचे भाव..
खरं तर कन्यादान आहे एक खराब प्रथा..
जिथे होतो एका जीवाचा सौदा...
करू नका तिच्या मना विरुद्ध जबरदस्ती..
ती आहे एक जिवंत हस्ती...
बदला तुम्ही तुमची विचारसरणी...
ती आहे स्वतःची हिरकणी..
नको तिला कोणी तिच्या आयुष्याचा चालक...
ती आहे तिच्या आयुष्याची मालक...
© Miva