...

15 views

म्हातारपण....
आठवत होत ते तरुणपण
होती ती आणि होतो आपण
लाजत हासत जुळलं आमचं मन
असं होत ते तरुणपण......

होती शक्ती होतो बलवान
दिशा होती एक आणि एकच बाण
मन होत तरुण अन मनात चावटपण
असं होत ते तरुणपण.......

पण आता.......

दुःखाच्या डोंगरात लपलेले मन
अन या वयात हरलेल तण
नाही शब्द नाही आपण
असं कस हे म्हातारपण......

नाही आता ते गोड शब्द
झाली पूर्ण व्याधी भ्रष्ट
शरीर फक्त कूजुन स्तब्ध
असं कस हे म्हातारपण.....

मुलगा गुंतलाय प्रपंच्याच्या जाळ्यात
मित्र सापडले देवाच्या माळ्यात
नाही आता शक्ती नाही आपण
असं कस हे म्हातारपण.......

हळवं असत मन, हळवी ती भावना
सुरुवात अन शेवटात असतो सारखेपणा
नाही गोड विचार नाही कुठल प्रेम
असं कस हे म्हातारपण.........

कुजबुज करिती जग हे सारे
रोगी असता सगळे म्हातारे
मरतो आता सुखाशी राहारे
असं कस हे म्हातारपण.....

आदर करतात चेहऱ्या-समोर
मागे कपटी स्वभाव अन कपटी मन
नाही उपयोग म्हणुन मार्ग वृद्धाश्रम
असं कस हे म्हातारपण......

हरतोय आता जगाच्या पुढे
मानस म्हणतो ती माणसं आता कुठे
एकटाच मी आणि एकट माझं मन
नको आता हे म्हातारपण........
नको आता हे म्हातारपण.......


© All Rights Reserved