...

7 views

ठरवून केलं असत
तुझी माझी भेट
हा फक्त निवळ्ळ योगायोग
ठरवून केले असते
तर नसता हा नशिबी भोग

नसता तो आरोप
त्या खोट्या डावांचा
नसता तो मोह
त्या विपरीत क्षणांचा

दाटले नसते ते अश्रू
जे भरीव होते डोळ्यात
गुंतलो नसलो कोणाच्याही
मधाळ अश्या बोलण्यात

नसतो झालो भावून
तुझी अवस्था पाहून
नसतो पडलो प्रेमात
तुझ्यासोबत राहून

नसते लागले व्यसन
ज्याचे कारण तू आहेस
माझ्या चुकलेल्या शब्दांचे
व्याकरण तू आहेस

नसता केलास अपमान
सर्वांसमोर माझा
साधी मुलगी समजून
ज्याने विचार केला तुझा

सोडून गेली नसतीस
जर ठरवून केलं असत
इतरांच मन दुखावून
तुझ्यावर प्रेम केलं नसत


© All Rights Reserved